Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : आता परिवर्त अटळ; ३ तारखेला मतदारसंघ जाहीर करणार; जरांगे पाटील यांची घोषणा

Vidhansabha Election 2024 : अतंरवाली सराटी येथे मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरूंनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवरून भाष्य केलं आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतंरवाली सराटीमध्ये गुरूवारी (ता.३१) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी निवडणुकीत मराठ, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याची घोषणा करताना ३ नोव्हेंबरला मतदारसंघांची घोषणा करू असे म्हटले आहे. तर ४ तारखेला ज्यांनी ज्यांनी फॉर्म घेतले आहेत. त्यापैकी एकच ठेवला जाईल, यासाठी समाजाचे हिताचा विचार करून इतरांनी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

अतंरवाली सराटीमध्ये मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरूंनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केली. यावेळी मौलाना हाजी सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर उपस्थित होते.

यावेळी जरांगे यांनी, आता आपण उमेदवारीवर भांडणार नाही. सगळ्या पक्षातील लोकांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा भाजपसह महायुतीतील नेत्यांना दिला आहे. तर मायक्रो ओबीसींना, शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? असा सवाल जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ असून याची शिकवण फडणवीस यांनीच दिल्याचा टोला देखील जरांगे पाटील यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी दलित-मुस्लिम, मराठ्यांची एकत्रित मोट बांधण्याची घोषणा केली.

महायुती सरकारवर टीका करताना, गेल्या ७५ वर्षापूर्वी विजेचा, पाण्याचा प्रश्न तसाच आहे. साधी कर्जमुक्तीही केली नाही, अशी टीका करताना एक रुपयांचा पीक विमा गेला कुठे?, असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला आहे.

शेतकरी, मराठा, धनगर आणि ओबीसींचे वाटोळं केलं. तुम्ही एकीकडे म्हणता समाजाबरोबर आहात आणि दुसरीकडे समाजावर वार केलेत. जे करायला नको होतं. मराठा समाजाला हिन वागणूक दिली. त्यामुळे आता हा उठाव झाला आहे. आता आम्ही कोणाच्या फंद्यात पडणार नाही. लोकशाही मार्गाने जाणार, कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT