Maratha Wedding  Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Community Wedding : मराठा समाजाने लग्न सोहळ्यात खर्च टाळून अचारसंहिता पाळावी

Lavish Wedding Ban : समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी. समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करावी, असे अवाहन केले.

Team Agrowon

Ahilyanagar News : मराठा समाजाने इतर समाजातील लग्नसोहळ्यांचा आदर्श घ्यावा, हुंडा तर देऊ आणि घेऊच नये. मागणी करणाऱ्याला समाजासमोर उघडे पाडावे, पण त्याबरोबरच लग्नात डीजे व प्री-वेडिंगसह खर्चिक बाबींना बंदी घालावी आणि बडेजाव टाळत विवाह सोहळा केवळ १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत अहिल्यानगर येथे घेण्यात आला.

येथे बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उद्योजक एन. बी. धुमाळ फाउंडेशनने ही बैठक आयोजित केली होती. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, अशोक कुटे, खासेराव शितोळे, विठ्ठल गुंजाळ, सी. ए. ज्ञानेश्वर काळे आदीं उपस्थित होते.

समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी. समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करावी, असे अवाहन केले. एन. बी. धुमाळ यांनी प्रस्ताविक केले. प्रा. दशरथ खोसे यांनी आभार मानले.

लग्न सोहळ्याबाबतच्या आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी ११ जणांची समिती केली आहे. लग्न सोहळ्यात छत्रपती शिवरायांची आरती करतात. ही प्रथा तत्काळ बंद करावी, अशी मागणी सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी केली.

बैठकीत ठरलेले निर्णय

१०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा. डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना पसंती

प्री- वेडिंग बंद करावे, केलेच तर जाहीर दाखवू नये. नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये

कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत

भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करावेत. देखावा करू नये, लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. इच्छा असेल, तर मुलीच्या नावावर एफडी करावी

जेवणात ५ पेक्षा जास्त पदार्थ नकोत. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी. दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT