PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Food Processing Sector : सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीसाठी मागील १० वर्षांत अनेक सुधारणा केल्या आहेत. भारताने अन्न क्षेत्रात नावीन्य, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यासाठी जागतिक मानदंड स्थापित केले आहेत.

Team Agrowon

New Delhi News : सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीसाठी मागील १० वर्षांत अनेक सुधारणा केल्या आहेत. भारताने अन्न क्षेत्रात नावीन्य, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यासाठी जागतिक मानदंड स्थापित केले आहेत. हे सुनिश्‍चित करण्याचा प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. १९) सांगितले.

नवी दिल्ली येथे १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान आयोजित तिसऱ्या ‘वर्ल्ड फूड इंडिया २०२४’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचण्यात आला. यामध्ये ९०हून अधिक देशांनी सहभाग घेतला आहे.

‘‘आधुनिक युगात, प्रगतिशील कृषी पद्धती, मजबूत प्रशासकीय आराखडा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताने अन्न क्षेत्रात नावीन्य, टिकाऊपणा आणि सुरक्षिततेसाठी जागतिक मानदंड निश्‍चित केले पाहिजेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी गेल्या १९ वर्षांत सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा केल्या आहेत,’’ असेही मोदी यांनी सांगितले.

जागतिक अन्न उद्योग, शैक्षणिक आणि संशोधनातील अधिकाधिक वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी अनेक राष्ट्रांचा सहभाग ‘वर्ल्ड फूड इंडिया २०२४’ला एक दिशादर्शक व्यासपीठ म्हणून दाखवतो. भारतात वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे. भारतीय खाद्य परिसंस्थेचा कणा शेतकरी आहे. हे शेतकरी आहेत ज्यांनी पाककला उत्कृष्टतेच्या पौष्टिक आणि स्वादिष्ट परंपरांची निर्मिती केली आहे. आम्ही नावीन्यपूर्ण धोरणे आणि केंद्रित अंमलबजावणीसह त्यांच्या कठोर परिश्रमांना पाठिंबा देत आहोत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

अन्न संरक्षण आणि मानक प्राधिकरणाद्वारे (एफएसएसएआय) ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिटचे आयोजन ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘एफएओ’ आणि अनेक प्रतिष्ठित देशांतर्गत संस्थांसह जागतिक नियामकांना एकत्र आणून अन्न सुरक्षा यांसारख्या विस्तृत मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. यापुढे मला खात्री आहे की अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी आणि अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी अन्न विकिरण, पोषण आणि शाश्‍वततेला चालना देण्यासाठी वनस्पती-आधारित प्रथिने, तसेच वर्तुळाकार अर्थव्यवस्था यासारखे महत्त्वाचे विषय प्रदर्शित केले जातील. त्याचबरोबर शाश्‍वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि पौष्टिक जग निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

‘अन्न पुरवठा साखळी आणि रोजगार निर्मिती’

‘‘अन्नप्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक, पंतप्रधान किसान संपदा योजना, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमाचे औपचारिकीकरण, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी उत्पादन जोड प्रोत्साहन योजना यासारख्या बहुआयामी उपक्रमांद्वारे आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांची मजबूत परिसंस्था निर्माण करत आहोत, देशभरात मजबूत पुरवठा साखळी आणि रोजगार निर्मिती,’’ असे ही मोदी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT