Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : शहादा तालुक्यात अनेक बंधारे, जलसाठे कोरडेठाक

Water Shortage : शहादा तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते.

Team Agrowon

Shahada News : गेल्या गेल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहादा तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी व नागरिक चिंतातुर झाले आहेत.

बागायतदार तालुक्यातील अनेक भागांतील बोअरवेल्स आटल्याने बागायती शेती धोक्यात आली आहे. शहादा तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तालुक्याची बागायतदार तालुका म्हणून सर्वदूर ओळख आहे. केळी, पपई, ऊस व मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

पण या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. आजची परिस्थिती बघता पाण्याची पातळी खोलवर गेल्याने एप्रिल व मेमध्ये पिकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक बोअरवेल्स कोरडे व्हायला लागले आहेत. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना आवश्यक आहेत. साधारणता चारशे फुटांपेक्षा जास्त खोलवर पाण्याची पातळी गेली आहे.

‘गंगोत्री’मुळे भूजल स्तर उंचावला

शासनाची ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडविण्यासाठी आतापासून उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जानेवारीत विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शहादा शहराला लागून गेलेल्या गोमाई नदीपात्रात नदी नांगरटी करण्याच्या उपक्रम राबविला होता.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन नदी नांगरटी केली होती. ज्याच्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी नांगरटी केल्या गेलेल्या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून मोठे पूर आल्यानंतर उपयोग झाला होता. पाण्याची पातळी ४०० फुटांवरून ९० ते १२५ फुटांपर्यंत आली होती.

जलयुक्त शिवारअंतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात यंदा अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याचा टिपूसही साठला नसल्याने कूपनलिका बंद पडल्या आहेत. बागायती शेती बोअरवेल्स आटल्याने शेतीसमोर जलसंकट आहे.
श्रीकांत पटेल, शेतकरी, बामखेडा, ता.शहादा, जि.नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT