Manoj Jarange  Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj jarange : लिफाफ्याची जादूही टिकली नाही, जरांगे आंदोलनावर ठाम

Swapnil Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर आज दुपारी माजी मंत्री अर्जुन खोतकर सरकारच्यावतीने एक बंद लिफाफा घेऊन उपोषणस्थळी दाखल झाले. परंतु जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने या लिफाफ्याची जादू फार काळ टिकली नाही.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी साकडं घातलं जात आहे. त्यासाठी सरकारने 7 सप्टेंबरला एक जीआरही काढला. त्यामध्ये ज्यांच्याकडे जुन्या नोंदीमध्ये कुणबी वंशावळचा उल्लेख असेल त्यांना सरसकट मराठा-कुणबी दाखला देण्यात येईल, असा शासन निर्णय घेतला. परंतु जरांगे यांनी त्या जीआरमध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबी अशी दुरुस्ती सूचवली आहे.

त्यावर काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर माजी आमदार अर्जुन खोतकर बंद लिफाफा घेऊन उपोषण स्थळी आले. त्यामुळे आज तोडगा निघेल, अशी आशा होती. पण जरांगे सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर बडतर्फची कारवाई कारवाई करावी. त्याचबरोबर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपण पुन्हा दुरुस्ती सूचवली आहे. उपोषण सुरुच राहील. सर्वांनी शांततेत आंदोलन करा. कुणालाही प्रत्युत्तर द्यायचं नाही. शांततेच आंदोलन करायचं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT