Shrivardhan News : कांदळवनात वाहणारी खाडी, स्थानिकांकडून होणारे मैत्रीपूर्ण आदरातिथ्य व जैवविविधतेमुळे श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे उत्तम पर्यटनस्थळ बनू पाहात आहे. वन विभागाच्या ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने’च्या माध्यमातून या गावाला वेगळी ओळख मिळाली आहे.
महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या गावची समृद्ध जैवविविधता पर्यटकांना दाखवण्याच्या उद्देशाने महिलांनी कांदळवन आणि त्यामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची शास्त्रीय नावांसह माहिती आत्मसात करून घेतली आहे.
श्रीवर्धनपासून १४ किलोमीटर तर श्री हरिहरेश्वर या धार्मिक पर्यटनस्थळापासून अगदी पाच किलोमीटर आहे. जैवविविधनेने संपन्न कांदळवनात खाडीच्या मध्यभागी बेट आहे. बेटावर जुनी वस्ती, गोठे, आंबा-बोरांची झाडे, मध्यभागी ११ गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
‘कायाकिंग’साठी प्रसिद्ध
काळिंजे येथील कांदळवनातील जैवविविधता लक्षात घेता, निसर्ग संवर्धनाबरोबर स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यामध्ये कांदळवनात बोट सफारी, मॅन्ग्रोव्ह ट्रेल, कांदळवन रोपवाटिकेला भेट, जंगलातील व बेटावरील पक्षी निरीक्षण, पारंपरिक मासेमारी व गळ टाकून मासेमारी (अँगलिंग) करण्यासाठी येथे पर्यटकांची रेलचेल असते.
कांदळवन प्रकल्पासाठी विभागाचे चांगले मार्गदर्शन मिळते. एक-दीड वर्षांत पर्यटकांची वर्दळही वाढली आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारी उपक्रमांबाबत जनजागृती झाल्यास पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल.- विक्रांत गोगरकर, अध्यक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.