Mango Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Crop : वाढत्या उष्णतेमुळे आंबा पीक अडचणीत

Mango Pest Management : यंदा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप पडला. परिणामी, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबा बागायतींमध्ये झाडांची पालवी जून झाली.

Team Agrowon

Ratnagiri News : थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा अडचणीत आलेला असताना दोन दिवसानंतर अचानक गुरुवारपासून (ता. ८) पारा ३२ ते ३४ अंश सेल्सिअसवर जात असल्यामुळे फळे भाजण्याची भीती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी उष्णतेचा परिणाम होत असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.

यंदा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप पडला. परिणामी, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबा बागायतींमध्ये झाडांची पालवी जून झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मोहोर झाडावर दिसू लागला.

या मोहोरातील उत्पादन मिळू लागले असून, फळे बाजारात दाखल झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला. त्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला.

तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोरावर वेळीच औषध फवारणी केल्यामुळे त्यामधून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे. त्यानंतरचा मोहोर थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे काळा पडलेला आहे. त्यामधून उत्पादन मिळणे अशक्य असल्याचे बागायतदारांचे मत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पोषक वातावरण होते. थंडीही चांगल्याप्रकारे पडलेली होती.

पारा २९ अंशावर होता; मात्र वातावरणात बदल झाला असून, पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. अचानक वाढ झाल्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे काही आंबा बागायतीमधील तयार झालेल्या फळांवर उन्हाचा स्ट्रोक बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर मार्च महिन्यात हाती येणाऱ्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे त्याचा परिणाम आंब्यावर होऊ शकेल. आतापासून सुरुवात झाली असून, काही ठिकाणी फळे उन्हामुळे भाजली आहेत.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार
जिल्ह्यात सध्या थ्रिप्सचा ठिकठिकाणी अॅटॅक झाला आहे. यंदा त्यामधून सावरण्याचे मोठे आव्हान बागायतदारांपुढे आहे. यावर संशोधन होणे आवश्यक असून, त्यासाठी लवकरच संघातर्फे कोकण कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे.
- प्रदीप सावंत, अध्यक्ष, आंबा उत्पादक संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन

Maharashtra Farmers Compensation: एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, आणखी काही तालुक्यांचा समावेश होईल - बावनकुळे

Farmer Protest: अतिवृष्टीच्या मदतीमध्ये नांदेड जिल्ह्याला भोपळा; शेतकरी-शेतमजुरांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

Farmer Compensation : ई-केवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर

Crop Damage : अचूक नुकसानीसाठी वाढीव पीक कापणी प्रयोग

SCROLL FOR NEXT