Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Wild Animal Crop Damage : राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात कित्येक एकरात आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे उदाहरण आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात कित्येक एकरात आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे उदाहरण आहे. तसेच संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांच्या काही भागांत गवा-रेड्यांच्या कळपांचे वास्तव्य आहे. याबाबत वन विभागाने गवारेड्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

गवारेडा प्रामुख्याने दोडामार्ग जंगलात मोठ्या प्रमाणात वावरत आहे. गेले तीन-चार वर्षे राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात गवा-रेड्यांचा वावर वाढू लागला आहे. सुरुवातीला दोनच गवे आढळून आले होते. आता त्यांची संख्या वाढून परिसरात आठ ते दहा कळपात झाली आहे. भालावली गाव १२ वाड्यांचा असून तेथील लोकसंख्या सुमारे १२०० ते १४०० आहे.

या गावातील शेतकरी, बागायतदारांनी आंबा, काजू, नारळ यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु गवा-रेड्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांना पळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. आठ ते दहा फूट उंचीच्या झाडांवरील हिरवा पाला, मोहराची गव्यांच्या कळपाकडून नासधूस होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

हे गवे मोठे असून मोठी झाडे सहज उद्ध्वस्त करून टाकतात. या संदर्भात वन विभागाकडे तक्रार करण्यात आली. परंतु त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर कार्यवाही न झाल्यास भविष्यात येथील बागायती शिल्लक राहणार नाही.

बागायतीबरोबरच भातशेतीचेही गवारेडे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान होत आहे. हीच परिस्थिती संगमेश्वर, लांजा, गुहागर या तालुक्यातही निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हास्तरावर गांभीर्याने पाहावे, असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

आंबा, काजू लागवडीवर परिणाम

आमची सुमारे ४० ते ५० एकर परिसरात आंबा, काजू लागवड करण्यात आली आहे, परंतु गेले तीन-चार वर्षे गवा-रेड्यांचा कळप दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास बागायतदारांना होत आहे. त्यांच्या उंचीच्या कक्षेत येणाऱ्या झाडांची पालवी, मोहर तोडतात.

झाडेही तोडून टाकतात. त्यांचा वावर या परिसरात वाढत असल्यामुळे कोणतीही उपाययोजना केली तरी ते येथून जात नाहीत. त्यांचा उपद्रव कमी करणे अवघड झाले आहे, असे आंबा बागायतदार जयेश विश्वासराव यांनी सांगितले.

गवा-रेड्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला दोन गवे दिसले. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उपद्रवासंदर्भात वन विभागाकडे लेखी पत्र दिले होते. परंतु त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. मनुष्यप्राण्यांवर हल्ला केल्यानंतर त्याच्या नुकसानीची भरपाई देण्याची मानसिकता प्रशासनाची असते. त्यामुळे वन विभाग गवा रेड्यांच्या बंदोबस्ताविषयी निर्णय घेत नाही.
- रूपेश गुरव, ग्रामस्थ, भालावली
आंबा, काजूमधून उत्पन्न मिळावे यासाठीच लागवड केलेली आहे. परंतु गवा-रेड्यांच्या वावरामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. ते गवे उंच व धिप्पाड असल्यामुळे त्यांच्या आवाक्यात येणाऱ्या झाडांची तोडमोड होते. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांचे नुकसान होते.
- अमरीश देसाई, आंबा बागायतदार व व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT