Kolhapur News : टस्कराने घाटकरवाडी पैकी डोंगरवाडीच्या जंगल भागात मुक्काम वाढवला आहे. दरवर्षी सुगीच्या दिवसात येणारा हा पाहुणा यंदा देखील या परिसरात दाखल झाला आहे.
हाता तोंडाशी आलेले भात, नागलीची पीक तो फस्त करीत आहे. पावसाच्या दणक्यात थोडीफार वाचलेली पिकेही हातची जाणार असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
तक्रार करूनही वन विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. चाळोबाच्या जंगलातून टस्कर दरवर्षी सुगीच्या दिवसात येतो. यंदाही तो दाखल झाला आहे. येथे तो बिनधास्तपणे वावरत आहे.
आंबोलीला भिडलेल्या सह्याद्रीच्या उपरांगेमध्ये आजरा तालुक्याचे शेवटचे टोक घाटकरवाडी, धनगरमोळा व किटवडे परिसर आहे. या परिसरातील जंगलात टस्कर वावरत असून सायंकाळी तो धनगरबाडी तलावात उतरतो.
तेथे मनसोक्त डुंबल्यानंतर शेतात उतरून पिकांचे नुकसान करतो. सुगीच्या दिवसात त्याचे आगमन झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. हातातोंडाशी आलेले भात, नागलीचे पीक फस्त करीत आहे.
तुडवूनही त्याच्याकडून नुकसान होत आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत असून त्याकडे वन विभागाकडून गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.