Mango, Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew Crop Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विम्याच्या ८३ कोटींची प्रतीक्षा

Fruit Crop Insurance : कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २६ हजार ९९२ आंबा बागायतदारांना, तर ८ हजार ४७१ काजू बागायतदारांना विमा परतावा देय आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना पीकविम्यापोटी ८३ कोटी १० लाख रुपये परतावा मिळणे अपेक्षित असून, या रकमेच्या प्रतीक्षेत बागायतदार आहेत. मात्र ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे या वर्षी पीकविमा क्षेत्र संरक्षित करायचे की नाही असा विचार शेतकरी करू लागले आहेत.

हवामानावर आधारित फळपीक योजनेत जिल्ह्यातील २७ हजार ६१७ आंबा बागायतदार, तर १० हजार ७४३ काजू बागायतदार, असे एकूण ३८ हजार ३६९ बागायतदारांनी ११ कोटी रुपये शेतकरी हिस्सा विमा कंपनीला भरून आपले क्षेत्र संरक्षित केले होते.

या वर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान यामुळे आंबा, काजूचे नुकसान झाले. कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २६ हजार ९९२ आंबा बागायतदारांना, तर ८ हजार ४७१ काजू बागायतदारांना विमा परतावा देय आहे.

आंबा बागायतदारांना ७३ कोटी ५ लाख, तर काजू नुकसानीपोटी १० कोटी ५ लाख अशी एकूण ८३ कोटी १० लाख रुपये परतावा मिळणे अपेक्षित आहे. परंतु ही रक्कम ऑगस्ट किवा सप्टेंबर महिन्यांत बागायतदारांच्या खाती जमा होणे अपेक्षित होते.

परंतु आजमितीस ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. या बाबत सिंधुदुर्गच्या कृषी अधीक्षक कार्यालयातील तांत्रिकी अधिकारी अरुण नातू म्हणाले की, जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८३ कोटी १० लाख रुपये विमा परतावा मिळणार आहे. जिल्ह्यातील ५७ स्वयंचलित केंद्रांच्या अहवालानुसार ही भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

SCROLL FOR NEXT