Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीमधील गैरप्रकार विधानसभेत गाजणार

APMC Scam : विविध गैरप्रकार, गैरव्यवहारांवरून चर्चेत असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज विधानसभा अधिवेशनात गाजणार आहे.

Team Agrowon

Pune News : विविध गैरप्रकार, गैरव्यवहारांवरून चर्चेत असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज विधानसभा अधिवेशनात गाजणार आहे. यामुळे संचालकांसह, अधिकाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.

पुणे कॅंटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी बाजार समितीमधील अतिक्रमणांबरोबरच विविध प्रश्‍नांवर तारांकित प्रश्‍न सादर केला आहे. हा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित होऊन त्याला पणनमंत्री अब्दुल सत्तार काय उत्तर देतात, याकडे बाजार घटक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.

पुणे बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ आल्यापासून, विविध कारणांनी बाजार समिती चर्चेत आहे. यामध्ये बाजार आवारातील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, विविध प्रकारच्या निविदा, बनावट पावती पुस्तकांद्वारे होणारा गैरव्यवहार, पायाभूत सुविधांचा अभाव आदी विविध प्रश्‍न गंभीर झाले आहेत.

हे प्रश्‍न सोडविण्यासाठी संचालक मंडळ आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बाजार घटक, शेतकरी, अडते असोसिएशनचे पदाधिकारी करत आहेत. मात्र या प्रश्‍नांना कोणीही दाद देत नसल्याचे अडते असोसिएशनचे पदाधिकारी सांगत आहेत.

सभापती बदलाच्या हालचाली

बाजार समितीचे सभापतिपदी सव्वा वर्षे वाटून घेण्यात आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार विद्यमान सभापतींचा ठरलेला कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असा दबाव संचालक आणत आहेत. यासाठी १० संचालकांनी पणन संचालकांकडे देखील दाद मागितली. मात्र तांत्रिकदृष्ट्या संचालकांनी केलेला दावा टिकला नसल्याने संचालकांचा हिरमोड झाला आहे.

‘एफएसआय’ घोटाळ्याची चर्चा

मुंबई बाजार समितीमधील एफएसआय घोटाळा गाजला असताना, पुणे बाजार समितीमध्ये देखील एफएसआय घोटाळा शिजत आल्याची चर्चा बाजार आवारात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याची देखील चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: १० कोटी महिलांना लखपती दीदी बनवू ; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Agriculture Growth: उत्तर प्रदेशातील शेती क्षेत्र देशात आघाडीवर, १७ टक्के वाढ, जाणून घ्या वाढीमागील ६ प्रमुख घटक

Shiv Sena NCP Symbol Disputes: स्थानिक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे- शरद पवारांना मोठा धक्का, पक्ष, चिन्ह वादावरील सुनावणी लांबणीवर

Phule Smart PDM App: कीड, रोग ओळखण्यासाठी ‘फुले स्मार्ट पीडीएम’

Heavy Rain Damage: धाराशिव जिल्ह्यातील १३७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच

SCROLL FOR NEXT