Organic Farming Agowon
ॲग्रो विशेष

Organic Certification : शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेची दारे झाली उघडी

Organic Farming : सेंद्रिय शेती करणे जितके अवघड त्याहीपेक्षा त्यांचे प्रमाणीकरण करून जगाच्या पाठीवर बाजार मिळवणे हे जास्त कठीण आहे.

Team Agrowon

Nanded News : सेंद्रिय शेती करणे जितके अवघड त्याहीपेक्षा त्यांचे प्रमाणीकरण करून जगाच्या पाठीवर बाजार मिळवणे हे जास्त कठीण आहे. परंतु मालेगावच्या शेतकरी मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीने ८० शेतकऱ्यांचे अपेडा अंतर्गत सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेचे दारे उघडी करून दिली करून दिले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या माध्यमातून राबवत असलेल्या बियाणे वाटप, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, दुबार पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमच यासारख्या कामांचे कौतुकही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देविकात देशमुख, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री शेळके, नीलेश देशमुख उपस्थितीत होते.

कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकरी मित्र कंपनीच्या कार्याचे कौतुक करून यापुढे शेतकऱ्यांना देश-विदेशामध्ये शेतीमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करून प्रमाणीकरण करून घ्यावे असे सांगितले.

मेघना कावली यांनी वर्तमान काळानुसार भविष्याची शेती पद्धती पाहून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून इतर साहित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन वाढवावे व आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक सेंद्रिय शेतीकडे वळावे. हर्षल जैन यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्यांचे सर्टिफिकेशन करण्यासाठी माहिती सांगितली.

शेतकरी मित्र कंपनीच्या माध्यमातून शंभरहून अधिक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठा वापरल्याने त्यांच्या उत्पादनातही आता चांगल्यापैकी वाढ झालेली आहे. त्यामुळे रासायनिक खते न वापरल्याने उत्पादन कमी होते असा गैरसमज शेतकऱ्यांनी करू नये कृषिभूषण भगवान इंगोले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT