Malagoan sugar mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : माळेगाव कारखान्याने ३४०१ रुपये ऊसदर द्यावा ; शेतकऱ्यांची आग्रही मागणी

Malagoan sugar mill : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी गाळप झालेल्या उसापोटी सभासदांना प्रतिटन ३४०१ रुपये दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Pune news : माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी ऊस दराची परंपरा आहे. ती परंपरा कायम ठेवण्यासाठी माळेगावच्या प्रशासनाने गतवर्षी गाळप झालेल्या उसापोटी सभासदांना प्रतिटन ३४०१ रुपये दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी शुक्रवारी (ता. १८) कारखान्याच्या प्रशासनाकडे अनेक सभासदांनी केली.

या वेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांचे मागणी निवेदन स्वीकारले. दुसरीकडे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांनी संबंधित सभासद शेतकऱ्यांना कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

या वेळी शेतकरी बाबूराव चव्हाण म्हणाले, माळेगावने २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात ३४०० रुपये दर सभासदांना दिल्याची नोंद आहे. अर्थात ती उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवण्यासाठी व गतवर्षीच्या उसापोटी ३४०१ रुपये अंतिम दर देण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब तावरे व त्यांच्या संचालक मंडळाने प्रयत्न केला पाहिजे. माळेगावने ऊस गळिताबरोबर वीज, इथेनॉल, अल्कोहोलचे विक्रमी उत्पन्न घेतलेले आहे. अर्थात तो आर्थिक फायदा ऊस दरामध्ये दिसून आला पाहिजे.

शेतकरी डी. डी. जगताप यांनी सोमेश्वर कारखान्याने सभासदांना प्रतिटन ३३५० रुपये ऊस दर जाहीर करून जिल्ह्यात ऊस दराच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत माळेगावनेही ३४०१ रुपये अंतिम दर जाहीर करून सभासदांना न्याय द्यावा. अर्थात ही मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही केल्याचे सांगितले. या वेळी संजय देवकाते, बाळासाहेब वाबळे, नितीन आटोळे, बाळासाहेब देवकाते, चंद्रराव देवकाते, शहाजीराव गावडे, निशिकांत निकम, प्रवीण पोंदकुले, बाळासाहेब गवारे, डी. डी. जगताप, रमेश देवकाते, नितीन मदने आदींनी ३४०१ रुपये ऊस दराची मागणी चांगलीच लावून धरली.

माळेगाव अधिकाधिक ऊस दर देण्यास कटिबद्ध...

अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, की माळेगावची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा आहे, ही गोष्ट खरी आहे. वास्तविक सोमेश्वच्या तुलनेत माळेगावची रिकव्हरी कमी आहे. माळेगावला गेटकेन ऊस घेण्यासाठी वाहतुकीचा खर्च सोमेश्वरच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय कारखान्यामध्ये विस्तारीकरणाच्या अनुषंगाने उर्वरित कामांसाठी मोठा खर्च झाला आहे. शासकीय व वित्तीय देणी आहेत. ही प्राप्त आर्थिक स्थिती विचार घेऊन माळेगावचा गतवर्षीचा अधिकाधिक अंतिम दर जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT