Export Non Basmati Rice agrowon
ॲग्रो विशेष

Non Basmati White Rice : मलेशिया भारताकडे करणार ५ लाख टन तांदळाची मागणी

Agriculture Minister Mohamad Sabu : मलेशिया भारताकडून अतिरिक्त ५ लाख टन पांढऱ्या तांदळाची मागणी करेल, असे कृषी मंत्री मोहम्मद साबू यांनी सांगितले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : भारत सरकारने २० जुलै पासून गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तर १८ ऑक्टोबर २०२३ ला विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढत नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह सात देशांना १० लाख ३४ हजार ८०० टन गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास सरकारने मान्यता दिल्याचे सांगितले होते. यावेळी मलेशियाला १ लाख ७० हजार टन गैर-बासमती तांदूळ पाठवण्यात आला होता. यानंतर आता मलेशियाचे कृषी मंत्री मोहम्मद साबू यांनी भारताकडे अतिरिक्त ५ लाख मेट्रिक टन पांढऱ्या तांदळाची मागणी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कृषी मंत्री साबू यांनी याबाबत बुधवारी (ता.२७) भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर फेसबुकवरील पोस्टमधून माहिती दिली आहे. 

तसेच यापूर्वी भारताने मलेशियाला १ लाख ७० हजार टन गैर-बासमती तांदूळ पाठवला होता. तर आता करण्यात येणारी विनंती ही याव्यतिरीक्त असेल. तर मलेशिया लवकरच त्यांच्या विदेश मंत्रालयाकडून भारताला अधिकृत विनंती करेल, असेही साबू यांनी म्हटले आहे. 

तसेच मलेशियाने जानेवारीमध्ये सरकार-ते- सरकार करारानुसार भारताकडे १ लाख टन कांद्याची विनंती केली होती, असेही साबू यांनी म्हटले आहे. राज्य तांदूळ आयातदार बर्नास यांच्या मते, मलेशियाचा वार्षिक तांदूळाचा वापर हा २.५ दशलक्ष टन असून सरासरी ७.५ लाख टन तांदूळ आयात करावा लागतो. 

जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारत असून महागाई कमी करण्यासह अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान विदेश मंत्रालयाच्या नितीनुसार केंद्राकडून ७ देशांना दिलासा देण्यासाठी गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीस परवानगी दिली होती.

नेपाळ, कॅमेरून, मलेशिया, फिलिपाईन्स, सेशेल्स, कोटे डी आयवर, गिनी आदी बेटसमूहांना १० लाख ३४ हजार टन तांदळाची निर्यात करण्यात आली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Agriculture Mortgage Loan : ‘शेतीमाल तारण’साठी औसा बाजार समितीचे पहिले पाऊल

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला

8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार

Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा

SCROLL FOR NEXT