Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Goverment Scheme : ‘जत्रा शासकीय योजनांची’ अभियान यशस्वी करा

‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १८) आढावा बैठक पार पडली.

Team Agrowon

Jalna News : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.

त्या अनुषंगाने आपल्या जालना जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे एक लाख लाभार्थ्यांना थेट लाभ द्या, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व विभागप्रमुखांना केली.

‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १८) आढावा बैठक पार पडली.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारीसंदिपान सानप यांच्यासह तहसीलदार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची’ असे हे अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहे.

या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येतील.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर/तालुका स्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, की १५ जूनपर्यंत चालणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उत्तम नियोजन करावे. सुमारे एक लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट या अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे.

योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात भरून द्यावी. या अभियानाचा आढावा नियमितपणे घेतला जाईल. त्यामुळे विभागप्रमुखांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करून ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान यशस्वी करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT