Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : धाराशिवच्या शिरढोणमध्ये फळबागांचे मोठे नुकसान

Crop Damage : शिराढोण परिसरातील फळबागांमध्ये आंबा, केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परिसरामध्ये शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Dharashiv News : येथे शुक्रवारी (ता. १२) आणि शनिवारी (ता. १३) जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाल्यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिराढोण परिसरातील फळबागांमध्ये आंबा, केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

परिसरामध्ये शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये टोमॅटो, मिरची, कांदा आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे.

दोन दिवसांत जवळपास ८० ते १०० मिलिमीटर पाऊस (Rain) पडला आहे. शासनाकडून तत्काळ पंचनामे करून भरीव अनुदानाची मदत देण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

दोन कूपनलिका आणि एक विहीर याचे मिळून दररोज एक तास पाणी उपलब्ध होते. त्या पाण्यापासून ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करून दोन एकर केळीची जोपासना केली. या केळीचे उत्पादन विक्रीसाठी तयार असताना अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले.
- बापूसाहेब सोमासे, शेतकरी, शिराढोण, ता. कळंब, जि. धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT