Farmers  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Sowing : दौंडच्या पूर्व भागात मका पेरणीला वेग

Maize Cultivation : या परिसरात सध्या मका पिकांबरोबरच गहू, हरभरा, कांदा लागवड, ऊस लागवड, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कलिंगड, टरबूज इत्यादी पिकांच्या पेरण्या आणि लागवडी सुरू आहेत.

Team Agrowon

Pune News : तालुक्याच्या पूर्व भागात ऊस तोडणी झाल्यानंतर मोकळ्या झालेल्या रानात मका पेरणीला वेग आला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. या परिसरात सध्या मका पिकांबरोबरच गहू, हरभरा, कांदा लागवड, ऊस लागवड, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कलिंगड, टरबूज इत्यादी पिकांच्या पेरण्या आणि लागवडी सुरू आहेत.

दौंडमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पेरण्यांनी गती घेतली आहे. शेतकरी ऊस तोडणीनंतर लागवडी करतात, त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत पेरण्या होतील. धान्यासाठीच्या म्हणजे उत्पन्नासाठी मका पेरणीकरिता हेक्टरी १५ ते २० किलो तर चाऱ्यासाठीच्या मका पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते.

दुग्ध व्यवसायामुळे मका लागवडीकडे कल

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव परिसरातील शेतकरी हा शेती बरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय करत आलेला आहे. त्यामुळे जनावरांना चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेतले जाते. काही जण उत्पन्नासाठी मका करतात. तर अलीकडच्या काळात राजेगाव आणि खानवटे या परिसरात मुरघास तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मका हे पीक घेतले जात आहे.

इथेनॉलसाठी मक्याला मागणी

ऊसतोडणी होईल तसे उशिराने मका, हरभऱ्यासह अन्य चारा पिकांची लागवड जानेवारी अखेरपर्यंत होत असते. त्यामुळे साहजिकच मका लागवडीने मोठी गती घेतली आहे. इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढल्यामुळे दर २५ ते ३० रुपये किलोपर्यंत गेल्याचा परिणाम मका लागवडीवर झाला आहे. बारामती परिसरात पशुखाद्य कारखान्यात मकेला मागणी आहे.

यासाठी मका उत्पादन घ्यायचे

जनावरांचा चारा

उत्पन्न

मुरघास

व्यवस्थापन, खते, पाणी नियोजन कराल तसा प्रतिसाद मका पीक देते. यात मका पीक घेतलेल्या शेतात जमिनीस विश्रांती देणे, पीक फेरपालट, वातावरण, जमीन व वाण या बाबीही कारणीभूत ठरतात. त्यातून एकरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन मिळू शकते.
- तेजश्री ढवळे, कृषी सहाय्यक, राजेगाव, ता. दौंड
छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने सर्व पेरण्या केल्या जातात. त्यासाठी एकरी दोन हजार रुपये खर्च येतो. यंदा मका पीक घेतले आहे. जास्त उत्पादन झाले तर मुरघास तयार केला जातो.
- प्रतीक थोरात, मका उत्पादक शेतकरी, राजेगाव ता. दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT