Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation : खानदेशात मका लागवड ५० हजार हेक्टरवर

Maize Sowing : खानदेशात यंदा मका लागवड वाढणार आहे. पण पाऊस कमी असल्याने लागवड रखडत सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा मका लागवड वाढणार आहे. पण पाऊस कमी असल्याने लागवड रखडत सुरू आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील लागवड ३० हजार हेक्टरपर्यंत पोचली आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीतही मका लागवडीत मोठी वाढ झाली होती. मका बियाणे टंचाई होती. रब्बीत एक लाख तीन हजार हेक्टरवर जळगाव जिल्ह्यात मका पीक होते. खरिपात जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर मका लागवड अपेक्षित आहे.

धुळे व नंदुरबारमध्ये मिळून सुमारे ६५ ते ७५ हजार हेक्टरवर मका पीक राहील, असाही कयास आहे. परंतु पावसामुळे मका लागवड रखडली आहे. जळगाव जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९३ हजार हेक्टर आहे. काही भागांत लागवड गतीने झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, मुक्ताईनगर, यावल, एरंडोल, धरणगाव या भागांत मागील आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने लागवड गतीने झाली. परंतु जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आदी भागांत कमी पाऊस असल्याने या भागात लागवड रखडत सुरू आहे.

धुळे व नंदुराबारमध्येही पाऊस कमी असल्याने लागवड रखतड सुरू आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार व नवापूर भागांत लागवड बरी आहे. परंतु शहादा, तळोदा भागांत लागवड रखडत सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर, धुळ्यात सुमारे ४० ते ५० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारमध्ये सुमारे २५ ते ३० हजार हेक्टरवर मका पीक लागवड होईल, असा अंदाज आहे. अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करून मका पिकाकडे वळले आहेत. काळ्या कसदार जमिनीत मका लागवड अधिक असणार आहे. हलक्या जमिनीत मका लागवड खरिपात कमी राहील, अशी स्थिती आहे.

पुढे लागवडीस गती शक्य

मका लागवडीसंबंधी उडीद, मुगासारखी मुदत नाही. मका लागवड खानदेशात कुठल्याही महिन्यात केली जात आहे. यामुळे जुलैत मका लागवड गती घेईल. पाऊस लांबल्यास कापूस पीक कमी होईल. उडीद, सोयाबीन पेरणीदेखील अनेक जण टाळतील आणि मका लागवड वाढेल, असे संकेत आहेत. पुढे पाऊस आल्यास लागवडीत गती येईल, असा अंदाज आहे.

लांबलेल्या पावसात कमी नुकसान

पावसाने मका पिकाचे सोयाबीन, उडीद, ज्वारी, कापूस पिकाच्या तुलनेत कमी नुकसान होते, असाही शेतकऱ्यांना अनुभव आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस आल्यास त्यात मका पिकाची हानी कमी होते. यामुळे शेतकरी मका पिकास पसंती देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Sunil Patil: दरवाढीच्या संकटातही शेतकरी हिताला प्राधान्य

Fuel Supply: शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना : देवेंद्र फडणवीस

Weekly Weather: कमाल आणि किमान तापमानात घट सुरू

Maharashtra Bhumapak Bharti: राज्यात १५०० खासगी भूमापकांची नियुक्ती

Devasthan Inam Act: ‘देवस्थान इनाम’ कायद्याला विश्‍वस्तांचा विरोध

SCROLL FOR NEXT