Kharif Planning Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Planning : खरिपासाठी निविष्ठांची पुरेशी उपलब्धता ठेवा

Kharif Season : ‘आगामी खरीप हंगाम लक्षात घेत कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात सर्वदूर उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

Team Agrowon

Akola News : ‘‘आगामी खरीप हंगाम लक्षात घेत कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात सर्वदूर उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ आदी उपस्थित होते.

‘‘जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खताचा पुरवठा व्हावा. रासायनिक खते व बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची साठेबाजी होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’’ असे श्री. कुंभार म्हणाले.

खरीप हंगामासाठी सोयाबीन, कपाशी बियाण्यांच्या मागणीनुसार कंपनीनिहाय उपलब्ध होणाऱ्या साठ्याबाबत अहवाल बैठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे ग्राम बीजोत्पादन मोहिमेमध्ये एकूण एक लाख ६८ हजार ६९७ क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध आहे. एकूण ६१ हजार ६८७ क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे.

सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र दोन लाख ३५ हजार हेक्टर आहे. कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र एक लाख ३५ हजार ५०० हेक्टर असून त्यासाठी सहा लाख ७७ हजार ५०० कापूस बीटी बियाणे पाकिटे मागितली आहेत. कापूस बियाणे उत्पादक कंपनीकडून पाच लाख ७५ हजार पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन आहे. खासगी कंपन्यांकडील सोयाबीन बियाण्याच्या एक लाख ५ हजार क्विंटलचे नियोजन आहे.

रासायनिक खतांचे नियोजन

हंगामासाठी ९१ हजार ६८७ टन रासायनिक खते पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून ८८ हजार ७०० टन रासायनिक खते पुरवठा करण्यास मंजुरी प्राप्त आहे. एप्रिल अखेर ४ हजार ३५५ टन खतांचा पुरवठा झाला आहे. ४२ हजार १२२ टन साठा शिल्लक आहे. संरक्षित खतसाठ्यात युरियाचा १ हजार ९५० टन व डीएपीचा ७४० टनांचा साठा करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार २३७ टन युरियाचा संरक्षित साठा केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT