Assembly Election Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Election Maharashtra : महायुती, ठाकरे गटाचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातून; तपोवन मैदानावर पहिली जाहीर सभा

Uddhav Thackeray Kolhapur : महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

sandeep Shirguppe

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होणार आहे. मंगळवारी (ता.०५) दुपारी ४ वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तर महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

यापूर्वी २०१४ साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे.

कोल्हापूरमध्ये महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, नुकतेच भाजपमध्ये आलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशी सत्तारूढ मंडळी आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून प्रचाराचा शुभारंभ

महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यानंतर ते तेथूनच कोकणात प्रचार दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture : अल्पभूधारकाने मिळवली दर्जेदार चॉकी निर्मितीत ओळख

Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Flower Market : फुलांच्या आकर्षक हारांसाठी प्रसिध्द सुपे बाजार

Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लस ठरणार मैलाचा दगड

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT