MahaVistar App  Agrowon
ॲग्रो विशेष

MahaVistar App : शेतकऱ्यांसाठी महाविस्तार अॅप झालं लॉन्च; बाजारभाव, हवामान अंदाज समजणार एका क्लिकवर

Agri Chatbot : चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं उतर अचूक मिळतं, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांच्या व्हाट्सअॅपवर देखील महाविस्तारचा चॅटबॉट उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी सचिवांना केल्या आहेत.

Dhananjay Sanap

MahaVistaar App Rolled Out :

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार मोबाईल अॅप लॉच केलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कृषी विभागाच्या खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता.२१) यांनी या अॅपचं उद्घाटन केलं. महाविस्तार अॅपमधून शेतकऱ्यांना शेतीपूरक माहिती मिळणार आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ पद्धतीने शेती पूरक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

महाविस्तार अॅपचं वैशिष्ट्य काय? (What are the features of the Mahavistar app?)

महाविस्तार अॅप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्याची उत्तरं चॅटबॉट काही सेकंदात शेतकऱ्यांना देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामात मदत होईल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

कोणती माहिती मिळणार?(What information will be available on Mahavistar App?)

हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण होऊ लागली आहेत. त्यामुळे हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असं जाणकार सांगतात. महाविस्तार अॅपमध्ये हवामान अंदाज, शेतीतील लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती या अॅपवर मिळते.

महाविस्तार अॅपचा चॅटबॉट अचूक उत्तर देत असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. तसेच चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं उतर अचूक मिळतं, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांच्या व्हाट्सअॅपवर देखील महाविस्तारचा चॅटबॉट उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी सचिवांना केल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, कृषी सल्ला, बाजारभाव व्हाटसअॅपवरून पाहता येतील.

महाविस्तार अॅप कसं वापरावं?(How to use the Mahavistar app?)

महाविस्तार अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन MahaVistar App असं सर्च करावं. महाविस्तार अॅप मोबाईलमध्ये इन्सटॉल करावं. त्यानंतर अॅपवर नोंदणी करून लॉगिन आयडी तयार करून घ्यावा. लॉगिन आयडी तयार झाल्यानंतर शेतकरी लॉगिन वापरुन महाविस्तार अॅपचा वापर करू शकते.

चॅटबॉट म्हणजे काय? ( What is a chatbot?)

चॅटबॉट एक संगणकीय प्रणाली आहे. यामध्ये संवाद करण्याची क्षमता विकसित करण्यात आलेली असते. हा संवाद मजकुराद्वारे किंवा आवाजाद्वारे केला जातो. चॅटबॉट्सचा उपयोग विविध सेवा देण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट कामं पूर्ण करण्यासाठी केला जातो. रूल बेस्ड आणि एआय बेस्ड चॅटबॉट दोन प्रकार आहेत. महाविस्तार चॅटबॉट एआय बेस्ड आहे. यामध्ये वेळ आणि श्रम वाचतो. तसेच शेतकऱ्यांना २४/७ सेवा मिळते. एकाच वेळी हजारो लोकांना सेवा देण्याची क्षमता असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT