Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दोन हजार एकरांवर बीजोत्पादन

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाणांची सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत यासाठी बीजोत्पादन घेतले जाते.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाणांची सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत यासाठी बीजोत्पादन घेतले जाते. यंदा खरिपात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व अन्य प्रक्षेत्राच्या सुमारे दोन हजार हेक्टरवर विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. पी. जी. पाटील यांनी बीजोत्पादन प्रक्षेत्राला भेट दिली व त्यांनी बियाणे, बीजोत्पादन संबंधित विविध बाबींचा आढावा घेतला. प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे डॉ. आनंद सोळंके, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, प्रा. बाळासाहेब शेटे, डॉ. सोमनाथ धोंडे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. कैलास गागरे उपस्थित होते. कृषी सहायक बुवासाहेब म्हस्के यांनी ‘ब’ विभागात बीजोत्पादन घेतलेल्या पिकांची माहिती दिली.

डॉ. पाटील म्हणाले, की संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाने बीजोत्पादन क्षेत्रावर ९० टक्के पेरणी झाली आहे. पीकस्थिती चांगली आहे. मध्यवर्ती प्रक्षेत्रावर, वेगवेगळ्या संशोधन योजना, कृषी महाविद्यालये, कृषितंत्र विद्यालये, कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावर खरीप २०२४ मध्ये दोन हजार एकरांवर खरीप हंगामातील भात, मूग, उडीद, तूर, तीळ, कापूस, मका, सोयाबीन व भुईमूग या पिकांचे २ हजार हेक्टरवर बीजोत्पादन घेतले जाणार आहे.

विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा मूलभूत बीजोत्पादन कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या लक्ष्यांकाप्रमाणे राबविण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या उत्पादन लक्ष्यांकापेक्षा तीन पट जास्त उत्पादन लक्ष्यांकाचे धेय्य ठेवून विद्यापीठाने कार्यक्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या बीजोत्पादन प्रक्षेत्रावर दहा हजार क्विंटल बियाणे उत्पादन लक्ष्यांकासाठी कार्यक्रम राबविला आहे.

वेगवेगळ्या संस्थांशी १३५ सामंजस्य करार

यंदाच्या खरिपात (२०२४) विद्यापीठाने ४७५० क्विंटल मूलभूत बियाणे वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय बीजोत्पादन संस्थांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले. विक्रीतून शिल्लक राहिलेले १००० क्विंटल मूलभूत बियाणे सत्यप्रत दर्जात रुपांतरीत करुन शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले. मूलभूत बियाणे विक्री पोटी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यंदाच्या खरिपात वेगवेगळ्या बीजोत्पादन संस्थांशी १३५ सामंजस्य करार केले असून त्यातून १५ कोटी ९० लाख व बियाणे विक्रीतून ३ कोटी ४१ लाख रुपये मिळाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT