Vegetable Seed Production : भाजीपाला बिजोत्पादनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक

Team Agrowon

भाजीपाल्याचे बियाणे उत्पादित करण्याचा व्यवसाय मोठा आहे. त्यासाठी बियाणे कायद्यातील कलम ९ अनुसार कोणत्‍याही शेतकऱ्याला बीजोत्‍पादन क्षेत्राची नोंदणी करता येते.

Vegetable Seed Production | Agrowon

पेरणीनंतर १५ दिवसांत बीजोत्‍पादन क्षेत्राची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करावी लागते.

Vegetable Seed Production | Agrowon

बीज प्रमाणीकरणासाठी विहित नमुन्‍यात अर्ज भरून तो नोंदणी शुल्‍कासह जिल्‍हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे रीतसर सादर करावा लागतो. या स्वतः शेतकरीही बीजोत्पादन करू शकतो.

Vegetable Seed Production | Agrowon

बीजोत्पादनासाठी प्रक्रिया, प्रतवारी, वितरण, विक्री व्‍यवस्‍था, साठवण या सर्व बाबी त्या शेतकऱ्याला कराव्या लागतात.

Vegetable Seed Production | Agrowon

सर्वांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांनी राज्‍य बियाणे महामंडळ, राष्‍ट्रीय बियाणे मंडळ किंवा खासगी बियाणे कंपन्‍यांकडे नोंदणी करावी लागते.

Vegetable Seed Production | Agrowon

विविध कंपन्या सातत्याने नवीन वाण विकसित करत असतात. त्यांनाही सर्व प्रमाणकांचे पालन करून उत्तम प्रकारे बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आवश्यकता असते.

Vegetable Seed Production | Agrowon

कंपन्यांशी संपर्क साधून नियमाप्रमाणे बीजोत्पादन करण शक्य आहे. बीजोत्पादनातून जास्त फायदा होतो.

आणखी पाहा...