Seed Production : बीजोत्पानात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आघाडीवर

PDKV Update : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे नेतृत्व मिळाले तर त्याचे परिणाम कसे राहू शकतात, हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अनुभवत आहे.
PDKV
PDKV Agrowon
Published on
Updated on

Akola News : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे नेतृत्व मिळाले तर त्याचे परिणाम कसे राहू शकतात, हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अनुभवत आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वात मागील काही महिन्यात या विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात कात टाकण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यंदा विद्यापीठ तब्बल ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक बीजोत्पादन करण्याच्या तयारीला लागले आहे. यापूर्वी सहा ते सात हजार क्विंटलपर्यंत हे बीजोत्पादन राहत होते.

साधारणतः तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत या विद्यापीठाच्या सर्व प्रक्षेत्रांवर खरीप-रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या बीजोत्पादनातून सहा ते सात हजार क्विंटलपर्यंत बियाण्याची उपलब्धता व्हायची. मात्र, गेल्या हंगामात हे बीजोत्पादन तब्बल १८ हजार क्विंटलपर्यंत येऊन पोचले.

विद्यापीठ प्रक्षेत्रावर महाकाय शेततलावांमुळे तयार झालेली शाश्‍वत सिंचनाची सुविधा, काही भागात वन्यजिवांपासून संरक्षणासाठी केलेले कुंपण तसेच शास्त्रज्ञांकडून होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळते आहे. यातूनच हे विक्रमी बीजोत्पादनाचे लक्ष्य साध्य होत आहे.

PDKV
Seed Production : महाबीजचे १९ हजार हेक्टरवर खरीप बीजोत्पादन प्रस्तावित

यंदाच्या वर्षात हवामानाने साथ दिली तर दोन्ही हंगामांतून सुमारे ३८ हजार क्विंटलचा लक्षांक ठेवण्यात आला. यंदा किमान ३० हजार क्विंटल उत्पादनाचा पल्ला गाठायचाच, असा निश्‍चित कुलगुरू डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठांच्या ‘ज्वाइंट ॲग्रेस्को’ दरम्यान व्यक्त केला होता.

त्याचे नियोजन कुलगुरू डॉ. गडाख यांच्यासह संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात कृषी विद्यापीठाच्या संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. आम्रपाली अतुल आखरे व त्यांच्या चमूने चालवले आहे.

विद्यापीठाच्या दोन्ही प्रक्षेत्रांसह बुलडाणा, अमरावती व इतर ठिकाणच्या प्रक्षेत्रांवर विविध पिकवाणांचे बीजोत्पादन केले जाते. यातील ७० टक्के वाटा हा अकोल्यातील दोन्ही प्रक्षेत्र मिळून असतो. विद्यापीठातर्फे खरीप व रब्बी हंगामात सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हे बीजोत्पादन केले जाते.

PDKV
Seed Production : ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राज्यभर घेतला जाणार
विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध पीकवाणांच्या बियाण्याचा प्रसार होण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या हितासाठी हा बीजोत्पादन कार्यक्रम खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अधिकाधिक बियाणे कसे तयार करता येईल, यासाठी सर्वांगीण नियोजन करीत प्रयत्न सुरु आहेत.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवि, अकोला.

यंदाचे प्रस्तावित बिजोत्पादन

प्रकार क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित उत्पादन (क्विंटल)

न्युक्लीयस ७७.२५ ८६७.६७

पैदासकार २५५०.७२ २९९४६.९७

प्रमाणित २६७.२ ३२०९

सत्यस्तीदर्शक १४८.०५ ४१९०.२५

एकूण ३०४३.२२ ३८२५३.९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com