MPKV  Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी संधी

Dr. B. S. Dwivedi : विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे असे मत नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे सदस्य डॉ. बी. एस. द्विवेदी यांनी केले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : कृषी विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच प्राध्यापक उत्कृष्ट पद्धतीने काम करीत आहे. विद्यार्थ्यांना जे. आर. एफ. तसेच एस. आर. एफ. च्या माध्यमातून शिक्षणाची संधी येथे मिळू शकते.

येथील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे असे मत नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे सदस्य डॉ. बी. एस. द्विवेदी यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे जे. आर. एफ., एस. आर. एफ., कृषी शास्त्रज्ञ तसेच लॅटरल इंट्रीद्वारे रोजगाराच्या संधी तसेच शिष्यवृत्तीच्या संधी आणि कृषिच्या संवर्धनासाठी संवाद कार्यक्रम झाला.

नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे सदस्य डॉ. बी. एस. द्विवेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, नागपूर येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय माती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. अनिल काळे, डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.

या वेळी डॉ. बी. एस. द्विवेदी, यांनी कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप तसेच त्यासाठी करावयाची तयारी यावर मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी, तर आभार डॉ. सचिन नलावडे यांनी मानले. या कार्यक्रमानंतर विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पांना मान्यवरांनी भेटी दिल्या. सकाळच्या सत्रामध्ये नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. वंदना द्विवेदी यांनी शेतीच्या शाश्वततेसाठी जमिनीच्या आरोग्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारत सरकार जमीन आरोग्य पत्रिकांच्या माध्यमातून जमिनीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत असून नैसर्गिक शेतीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT