Shiwarferi : आले पिकातील सडसंदर्भात शिवार फेरीत मार्गदर्शन

Activities for Farmers : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार सांगवी परिसरात शिवार फेरी तसेच ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Shiwarferi
ShiwarferiAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात आले पिकाची लागवड खरीप हंगामात करण्यात आली होती. त्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मूळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार सांगवी परिसरात शिवार फेरी तसेच ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

तालुक्यात आले पिकाची जवळपास २५०० ते ३००० एकरावर लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मूळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात आलेल्या आर्थिक संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाले.

Shiwarferi
PDKV Shiwarferi : शिवारफेरीत गर्दीने प्रक्षेत्र फुलले

हे लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच बाजार सांगवी, सोबलगाव, सुलतानपूर, भांडेगाव, खांडी पिंपळगाव इत्यादी परिसरात शिवार फेरी केली. त्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन आले पिकाची पाहणी व उपाय सुचविण्यात आले.

Shiwarferi
PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पचे शास्त्रज्ञ यांचा या पाहणी दौऱ्यात सहभाग होता. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रभारी डॉ. सूर्यकांत पवार यांनी आले पीक घेताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

या वेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी के. एन. इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर. के. गायकवाड, पी. व्ही. घायत, कृषी सहायक महेश सदावर्ते, संजय सुरसे, गणेश सुरडकर, सचिन सरगर, श्रीकृष्ण नागरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com