MPKV, Rahuri : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून नवीन यंत्र निर्मिती शक्य

Tifan Competition : डॉ. मेहता ः महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफण स्पर्धा
Vegetable Replanting Machine
Vegetable Replanting MachineAgrowon
Published on
Updated on


ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagar News : नगर ः ‘‘तिफण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलित यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. आजचे जग स्वयंचलित तंत्रज्ञानाचे असून या स्पर्धेमध्ये शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्‍या यंत्रांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. तिफण स्पर्धा म्हणजे देशामधील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम आहे,’’असे मत भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान ‘तिफण-२०२४’ या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेला शनिवारी (ता.२४) सुरवात झाली. उदघाटनाला डॉ. सी. आर. मेहता यांच्यासह अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, आंतरविद्या जलसिंचन शाखेचे विभाग प्रमख डॉ. महानंद माने, कृषियंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कार्यक्रमाचे समन्वयक अजय अग्रवाल, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष डॉ. कृष्णांत पाटील, डॉ. रविकिरण राठोड, डॉ. प्रवीण कदम उपस्थित होते.

Vegetable Replanting Machine
MPKV, Rahuri : कडधान्य सुधार प्रकल्प ठरले उत्कृष्ट संशोधन केंद्र

विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये काम करत असतात, पण हेच काम त्यांनी प्रक्षेत्रावर करून एखादे यंत्र शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विकसित करणे व कृषी यांत्रिकीकरणाला चालना देणे तसेच उद्योजकतेचे धडे यातून मिळावेत, हा या तिफण स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून यंदा ट्रॅक्टरचलित किंवा स्वयंचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रावर ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७३ संघ सहभागी झाले होते. त्यातील फेज १ मध्ये ४३ संघाची निवड झाली आणि अंतिम फेरीसाठी सहा राज्यातून २७ संघाची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे.

यामध्ये पंजाब राज्यातील दोन संघ, तमिळनाडू राज्यातील चार संघ, मध्यप्रदेश दोन संघ, केरळ व तेलंगणा प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून १७ संघ असे एकूण २७ संघ सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेत या अंतिम २७ संघानी बनविलेल्या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रांच्या पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या, प्रत्यक्ष शेतावरही यंत्रांची प्रात्यक्षिक होईल. अंतिम फेरीत २७ संघांतील स्पर्धेसाठी एकूण ५५६ विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि ६० पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषियंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ३६ पंचांची नेमणूक केली आहे. आज (ता. २६) स्पर्धेचा समारोप होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com