Maharashtra Sugar Industries agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sugar Industries : राज्याचा साखर उतारा व गाळप घटलं; ३१ डिसेंबरअखेर २९ लाख टन साखर उत्पादन

Sugar Production Maharashtra : राज्याचा सरासरी साखर उताराही गतवर्षीच्या तुलनेत घटला असून, तो ८.९ वरून ८.६ वर आला आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक १०.१३ असून सर्वांत कमी नागपूर विभागाचा ४.९२ आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugar Production : १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेला ऊस गळीत हंगाम डिसेंबरमध्ये वेगाने सुरू झाला. दरम्यान राज्यात ३१ डिसेंबरअखेर १९० साखर कारखान्यातून २९ लाख १५२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागच्या वर्षी ३१ डिसेंबरअखेर ३८ लाख ३ हजार टन झाले होते. राज्याचा सरासरी साखर उताराही गतवर्षीच्या तुलनेत घटला असून, तो ८.९ वरून ८.६ वर आला आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक १०.१३ असून सर्वांत कमी नागपूर विभागाचा ४.९२ असल्याची माहिती साखर आयुक्त विभागाकडून मिळाली आहे.

साखर आयुक्त विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सहकारी ९६ आणि खासगी ९४ अशा १९० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यांनी ३१ डिसेंबरअखेर ३३८ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. यातून २९ लाख १५२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

पुणे विभागात ८४.६४ लाख टन उसाचे गाळप

पुणे विभागात ८४.६४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ७३.६८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी रिकव्हरी दर ८.७१ टक्के आहे. पुणे विभागात ३१ कारखाने कार्यरत असून त्यात १८ सहकारी साखर कारखाने आणि १३ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर विभागात ३९ कारखाने चालू असून त्यांनी ७८.५९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत ७९.६३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. या विभागाने राज्यातील सर्वाधिक १०.१३ टक्के साखर उतारा मिळविला आहे.

सोलापुरात ४१ साखर कारखाने कार्यरत

सोलापुरात ४१ साखर कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १६ सहकारी आणि २५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ५९.३२ लाख टन उसाचे गाळप केले असून ७.६२ टक्के रिकव्हरीसह ४५.२१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर विभागात २५ कारखाने सुरू असून त्यापैकी १५ सहकारी आणि १० खासगी आहेत. या कारखान्यांनी ४३.१९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ७.९६ टक्के रिकव्हरी रेटसह ३४.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT