Madhukranti Portal  Agrowon
ॲग्रो विशेष

Madhukranti Portal : मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

Maharashtra State Horticulture and Medicinal Plants Board : मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे.

Team Agrowon



Ahilyanagar News : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने केले आहे.

मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आले आहे. राज्यात ‘राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान’ ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. हे अभियानांतर्गत लघू अभियान १, २ आणि ३ समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध लाभ मिळणार आहेत. यात मधुमक्षिका पालकाला नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे.

तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करता येणार आहे मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधी तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-२०० केबीपर्यंत), मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० केबीपर्यंत) ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

या नोंदणीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या १० ते १०० फ्रेमसाठी २५० नोंदणी शुल्क, १०१ ते २५० फ्रेमसाठी ५०० रुपये, २५१ ते ५०० फ्रेमसाठी एक हजार, ५०१ ते १ हजार फ्रेमसाठी दोन हजार, १००१ ते दोन हजार फ्रेमसाठी दहा हजार, २००१ ते ५ हजार फ्रेम साठी २५ हजार, ५००१ ते दहा हजार फ्रेमसाठी एक लाख तर दहा हजारांपेक्षा अधिक फ्रेमसाठी दोन लाख नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मधमाशी मंडळ, (०११-२३३२५२६५, २३७१९०२५), मधुक्रांती पोर्टल टेक्निकल सपोर्ट, (१८००१०२५०२६), महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे (०२०-२९७०३२२८) संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT