Maharashtra Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sugar Production : महाराष्ट्राचा देशपातळीवर साखर उत्पादनात डंका, उत्तर प्रदेशला मागे टाकण्याची शक्यता

Sugar Production India : मागील दोन वर्षे साखर उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या उत्तर प्रदेशला यंदा महाराष्ट्र मागे टाकण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production India : राज्यातील यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील २०० हून अधिक साखर कारखान्यांमध्ये जवळपास १२० कारखान्यांनी गळीत हंगाम संपुष्टात आल्याचे जाहीर केले. राज्यात कालपर्यंत १हजार ४६.८३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप वाढल्याचे दिसून येत आहे. तर मागील दोन वर्षे साखर उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या उत्तर प्रदेशला यंदा महाराष्ट्र मागे टाकण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात यंदा मार्चअखेर १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, अजूनही ६७ कारखान्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे हंगामाअखेर १०९ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राबरोबर ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. युपीमध्ये आतापर्यंत केवळ ९७ लाख टन उत्पादन झाल्याची माहिती समोर आली आहे.

हंगामाअखेर जास्तीत जास्त १०५ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी माध्यमांना दिली.

यंदाच्या हंगामाअखेर देशातील निव्वळ साखर उत्पादन ३१८ लाख टन होण्याचा अंदाज असून, ते गेल्या वर्षीच्या ३३०.९० लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत केवळ १३ लाख टन कमी असेल. याव्यतिरिक्त १७ लाख टन इथेनॉलनिर्मितीकडे साखर ही वळविण्यात आली असल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली.

हंगामात २,९५० लाख टन उसाचे गाळप झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १०२ लाख टनने कमी आहे. मात्र, यंदा सरासरी साखर - उताऱ्यात ०.२८ टक्के वाढ झाल्याने निव्वळ ३०० लाख टन साखर उत्पादन हे जवळपास गेल्या वर्षी मार्चअखेर झालेल्या साखर उत्पादनाच्या बरोबरीने आहे, असेही नाईकनवरे म्हणाले.

केंद्र सरकारने डिसेंबरमध्ये इथेनॉलनिर्मितीवर निर्बंध लादले होते. त्यामुळे कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांत बी हेवी मळीचा शिल्लक साठा अडकून पडला आहे. त्याचा पूर्ण वापर केल्यास १७० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन वाढू शकते.

त्याद्वारे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केलेल्या लक्ष्यपूर्तीसाठी हातभार लावू शकते, असे निवेदन महासंघाने संबंधित मंत्रालयांकडे दिले आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT