Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : उसाच्या १०.२५ उताऱ्याला मिळणार ३१५० रुपये दर, गाळप हंगामातील अंतिम उतारा निश्चित

Sugarcane Farmer : साखर उतारा निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Government News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा अंतिम दर देण्यासाठी उसाच्या गाळप हंगामातील अंतिम उतारा निश्चित करण्यात आला आहे. पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित करण्यात आला आहे.

त्यासाठी ३१५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५० टक्के साखर उतारा निश्चित केला असून, त्यासाठी २९९१ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली आहे.

मात्र, यंदाचा गाळप हंगाम संपल्यानंतर साखर उतारा, उपपदार्थ विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम यांचा तपशील साखर आयुक्तांना सादर केल्यानंतर अंतिम दर निश्चित करण्यात येणार आहे. साखर उतारा निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा टप्प्याटप्प्याने देण्यात येत असलेल्या एफआरपीला विरोध आहे. परंतु, साखर आणि उपपदार्थ विक्रीतून अंतिम ऊसदर ठरविण्याचे सूत्र शासनाने स्वीकारल्याने दुसऱ्या टप्प्यात साखर कारखान्यांनी अंतिम दर ठरवून दर देणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकार दर वर्षी गाळप हंगाम सुरू करण्याआधी नवीन हंगामात कोणत्या दराने किमान एफआरपी द्यायची याबाबत अधिसूचना जारी करते. त्यानुसार १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३१५० रुपये, तर ९.५० टक्के उताऱ्यासाठी २९९१ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर कारखान्याच्या फाटकाजवळ आणून दिलेल्या उसासाठी निश्चित करण्यात येतो.

१०.२५ आधारभूत उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल ३१५ रुपये, तर १०.२५च्यावरील प्रत्येक ०.१ टक्के उतारावाढीसाठी ३.०७ रुपये प्रीमियम दर प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. १०.२५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ९. ५० पेक्षा जास्त साखर उतारा असल्यास प्रत्येकी ०.१ टक्के उतारा घटीसाठी ३.०७ रुपये प्रतिक्विंटल, तर ९.५० किंवा त्यापेक्षा कमी असल्यास २९१ रुपये प्रतिक्विंटल देण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT