Maharashtra Assembly Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनात १०६४ लक्षवेधी

Nagpur Adhiveshan : हिवाळी अधिवेशनाचे सत्र ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. लक्षवेधी, तारांकित प्रश्‍न, ठराव, प्रस्ताव, अर्धातास चर्चा या माध्यमांतून सदस्य मुद्दे उपस्थित करतात.

Team Agrowon

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाचे सत्र ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. लक्षवेधी, तारांकित प्रश्‍न, ठराव, प्रस्ताव, अर्धातास चर्चा या माध्यमांतून सदस्य मुद्दे उपस्थित करतात. ३० नोव्हेंबरपर्यंत १०६४ वर लक्षवेधी विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल झाल्याची माहिती आहे.

शासनाचे तातडीच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदारांकडून सभागृहात लक्षवेधी मांडून प्रश्‍न निकाली काढला जातो. तसेच तारांकित प्रश्‍नांच्या माध्यमातून वाचा फोडली जाते. यात विधानसभेमध्ये गुरुवारी ३० नोव्हेंबरपर्यंत ७ हजार ४१३ प्रश्‍न, तर १ हजार ६४ लक्षवेधी प्राप्त झाल्या.

९५ अर्धा तास चर्चा व २६३ अशासकीय ठराव प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. तर विधान परिषदेत १८०० वर तारांकित प्रश्‍न अंतिम करण्यात आले. तर २५४ लक्षवेधी प्राप्त झाल्याची माहिती आहे. ग्रंथालय सज्ज होत आहे

अधिवेशन काळात येथील ग्रंथालय हे सर्वांत महत्त्वाचे असते. मंत्र्यापासून आमदारापर्यंत सर्वांनाच ऐतिहासिक भाषणे, दाखले, नियम, टिपण यांची गरज असते. याच्या माहितीसाठी सर्व जण ग्रंथालयाकडेच धाव घेतात. संशोधक विद्यार्थ्यांनाही अनेक गोष्टींसाठी ग्रंथालयाचाच आधार घ्यावा लागतो. ग्रंथालयात पुस्तके, ग्रंथ, दस्तऐवज लावण्याचे काम जोमात सुरू होते.

कागदपत्रे, दस्त ठेवण्याचे काम जोमात

विधान भवनात कामे जोरात सुरू आहेत. मंत्री, अधिकारी यांचे दालन व कार्यालयात नावांचे फलक लावण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबईवरून साहित्यही आले असून, कागदपत्रे व दस्तऐवज व्यवस्थित ठिकाणी लावण्यात येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र

Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT