Mumbai News: राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यांत झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदत निधीस मान्यता देण्यात आली. या बाबतचा शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या मान्यता देण्यात आलेल्या निधीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार, अमरावती विभागासाठी ८६ कोटी, २३ लाख, ३८ हजार आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यांत झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकऱ्यांच्या ७२.३२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १६.०१ लाख, हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार २४७ शेतकऱ्यांच्या १६११.३७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३६०.४५ लाख, नांदेड जिल्ह्यातील ७ हजार ४९८ शेतकऱ्यांच्या ४७९०.७८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १०७६.१९ लाख आणि बीड जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या ११ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १.९९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील २ हजार २४० शेतकऱ्यांच्या १३१२.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २ कोटी ७५ लाख ७९ हजार, अकोला जिल्ह्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांच्या ३७९०.३१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४ कोटी ६ लाख ९० हजार, यवतमाळ जिल्ह्यातील १८६ शेतकऱ्यांच्या १३०.५० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २५.४५ लाख,
बुलडाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांच्या ८७३९०.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७४ कोटी ४५ लाख ३ हजार आणि वाशीम जिल्ह्यातील ८ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या ५१६२.२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४ कोटी ७१ लाख २१ हजार २१ लाख रुपये इतक्या निधीचा समावेश आहे.
सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या १८९६१०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २६ कोटी १६ लाख ३८ हजार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५४८ शेतकऱ्यांच्या ४८९१.०५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ६ कोटी ६५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.