Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : महाबीजचा १४ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित

Mahabeej Seed : महाबीजच्या परभणी विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात येतो.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचा मिळून एकूण १४ हजार ८६१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.

याद्वारे १ लाख ९० हजार ६०९ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. विशेष बाब म्हणून खरीप २०२४ च्या तुलनेत यंदाच्या (२०२५) खरिपातील सोयाबीन बियाणे २ टक्के वाढीव दराने खरेदीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

महाबीजच्या परभणी विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये केवळ सोयाबीन या पिकांचे क्षेत्र सर्वाधिक १४ हजार ३९२ हेक्टर असून १ लाख ८६ हजार ३४५ क्विंटल कच्चे बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयुएस-६१२, एमएयुएस-१६२, एमएयुएस -१५८, एमएमएयुएस -७१ या वाणांचा समावेश आहे. महात्मा कृषी विद्यापीठाचे फुले संगम (केडीएस ७२६), फुले किमया (केडीएस ७५३), फुले दुर्वा (केडीस ९९२), डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया या वाणांचा समावेश आहे.

इतर वाणांमध्ये जेएस-३३५, डीएस-२२८ या वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. तुरीच्या गोदावरी, बीडीएन-७११, बीडीएन-७१६ या वाणांचे एकूण १२९.५८ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित असून १ हजार २९५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. मुगाच्या उत्कृर्षा,बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, फुले चेतक या वाणांचे ६१.८४ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित असून ४९४ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

उडदाच्या एक्यू १०-१, टीएयु-१ या वाणांचे २७७ हेक्टरवर बीजोत्पादन असून २ हजार २२१ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. विभागातील सर्व सहा जिल्ह्यातील महाबीजच्या जिल्हा कार्यालयात बीजोत्पादन कार्यक्रमाची अग्रिम नोंदणी केलेल्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जात आहे. जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. पोकरा अंतर्गंत निवड झालेल्या गावात बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT