Maharashtra State Seeds Corporation Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej : ‘महाबीज’च्या भाग धारकांना यंदा मिळणार ३० टक्के लाभांश

Maharashtra State Seeds Corporation : महाबीजची ४७ वी वार्षिक सर्व साधारण सभा राज्याचे कृषी आयुक्त भागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) ४७ वी सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २१) झाली. या सभेचे औचित्य साधत महाबीजचे पहिले अध्यक्ष नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरणही या वेळी करण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त भावात व वेळेवर उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ  अर्थात महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी करण्यात आली. ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बियाणे कंपनी म्हणून उत्कर्षास आलेल्या या राज्यव्यापी संस्थेचे मुख्यालय अकोला येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री तथा महाबीजचे प्रथम अध्यक्ष (कै.) नानासाहेब सपकाळ यांच्या पुढाकाराने झाली. यानिमित्त सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरण महाबीजच्या ४७ व्या वार्षिक सभेचे औचित्य साधून भागधारक प्रकाश काकड यांच्या पुढाकाराने अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष कोरपे यांच्या हस्ते झाले.

या वेळी खासदार अनूप धोत्रे, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, व्यवस्थापकीय संचालक  योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.. या प्रसंगी डॉ. सुभाषचंद्र कोरपे, माजी आमदार  दादासाहेब खोटरे, डॉ. अनंतराव भुईभार, डॉ. विनोदराव बोर्डे,  प्रकाश काळे, अनिल देशमुख, प्रा. भाकरे, प्रा. दिनकर पाटील, संजय भाकरे, सुहासिनी धोत्रे, समीक्षा धोत्रे, मंजूषा रणधीर सावरकर, शर्मीला सपकाळ, प्रगती भुईभार, श्रीमती धनलक्ष्मी भुईभार व महाबीजचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

आज महाबीजच्या रुपाने रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होऊन भारतातील सर्व राज्य बियाणे महामंडळांमधील अग्रगण्य राज्य बियाणे महामंडळ म्हणून मागील ४ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी अविरत कार्य करत असल्याचे उद्गार डॉ. कोरपे यांनी अनावरण प्रसंगी काढले. तसेच शेतकऱ्यांच्या व महामंडळाच्या हिताकरिता केंद्र सरकारकडे निश्चितच पाठपुरावा करू, असे नवनिर्वाचीत खासदार श्री. धोत्रे यांनी या प्रसंगी आश्वासीत केले. रामेश्वर सपकाळ यांनी नानासाहेब सपकाळ यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

भाग धारकांना ३० टक्के लाभांश

अनावरण सोहळ्यानंतर महाबीजची ४७ वी वार्षिक सर्व साधारण सभा राज्याचे कृषी आयुक्त भागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वलभराव  देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ यांच्या उपस्थितीत  झाली.

या सभेमध्ये भागधारक प्रकाश काकड यांनी अथक परीश्रम घेउन मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले ३४ कोटी अनुदान महाबीज बीजोत्पादनांना प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांचा भागधारकांकडून सत्कार करण्यात आला. तसेच भागधारकांना ३० टक्के लाभांश जाहीर करुन राज्यातील बीजोत्पादक, भागधारक व शेतकरी यांचे हिताचे निर्णय या सभेमध्ये घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers: मॉरिशसचे मृगजळ?

Banana Farming: खानदेशात दर्जेदार केळी आवकेत वाढ

Jaggery Export: युद्धामुळे गूळ निर्यात थांबली

Leopard Protection: बिबट्याला शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा निर्णय

Forest Food: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे दोनदिवसीय प्रदर्शन

SCROLL FOR NEXT