Mahabeej  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Agriculture Workshop : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने कानशिवणी येथील नागोराव महाराज मंगल कार्यालयात ‘महाबीज’च्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने कानशिवणी येथील नागोराव महाराज मंगल कार्यालयात ‘महाबीज’च्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशराव वाघमारे, देवानंद वाघमारे, जगदेव वाढई, वासुदेवराव शेळके, ज्ञानेश्वर वाघमारे,

अनिल देशमुख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे उत्पादन महाव्यवस्थापक विवेक ठाकरे, विपणन महाव्यवस्थापक प्रकाश ताटर, विभागीय व्यवस्थापक गजानन देशमुख, जिल्हा व्यवस्थापक विजय अस्वार, कृषी क्षेत्र अधिकारी देवेंद्र सपकाळ, कृषी क्षेत्र अधिकारी विजय झांबरे, कृषी क्षेत्र पर्यवेक्षक विजय महाजन, कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र कुलकर्णी, कृषी सहाय्यक अशोक करवते होते.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामात महाबीजद्वारे उत्पादित विविध पीक वाणांची तसेच बीज प्रक्रिया, जैविक उत्पादने, पेरणी अगोदर शेतीची मशागत, बीज प्रक्रिया तसेच नंतर कीडविषयी फवारणी कोणती करावी, पिकाचे संगोपन आणि पिकांचे जास्त प्रमाणात उत्पादन कसे घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला कानशिवणी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय वाघमारे, नारायण पंडागे, प्रकाश जाधव, वासुदेव गवई, विजय लुले, श्री वाकोडे यांनी पुढाकार घेतला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन देवेंद्र सपकाळ यांनी तर आभार देवानंद वाघमारे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT