MVA Manifesto  Agrowon
ॲग्रो विशेष

MVA Manifesto : मविआच्या महाराष्ट्रनामात पाच गॅरंटी; शेतकऱ्यांसाठी गुलाबी क्रांती योजना अन् कर्जमाफी

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आपला जाहिरनामा जाहीर केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा जाहिरनामा महाराष्ट्राच्या विकासाचा महाराष्ट्रनामा असल्याचे म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाविकास आघाडीने आपल्या घोषणापत्रात म्हणजेच महाराष्ट्रनामात पाच गॅरंटी दिल्या आहेत. रविवारी (ता.१०) काँग्रेस नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी, गुलाबी क्रांती योजनेसह लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे जाहीर केले आहेत. तसेच तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासने देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महाराष्ट्रनाम्यात शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यास शेतकऱ्यांना ५० हजारांची सूट देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यासह शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढू असे आश्वासन देण्यात आले आहे.

यावेळी खरगे यांनी, जाहीरनाम्यातून पाच गॅरेंटी यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सामाजिक बदलांमध्ये सर्वात पुढे असल्यानेच देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. राज्यातील जनता, शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. दलबदलूंसाठी महत्वाची नाही. यांना सत्तेतून हटवलं तर चांगले आणि स्थिर सरकार देता येईल, असे म्हटले आहे. राज्याच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्रनामा तयार केल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.

खरगे यांनी आम्ही लाडकी बहिण सुरु केली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी टिंगल केली होती. आज ते आपल्या प्रत्येक राज्यात ही योजना राबवत आहेत. यामुळे आमचीच योजना त्यांनी कॉपी आहे. तर आम्ही तेलंगणात शनिवारी (ता.९) पासून जातिनीहाय जनगणना सुरू केली असून आमचा उद्देश समाजाला विभागणे नसून गरीबांना मुख्य प्रवाहात आणायचा आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्जमाफीवरून महायुतीवर टीका करताना, आता महायुतीवाले म्हणतायत की आम्ही कर्ज माफी देऊ. मग सत्तेत असताना का कर्जमाफी दिली नाही. जनतेच्या डोळ्यात फक्त धुळफेक केली जात असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रनामात काय?

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास ५० हजारांची सूट

३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार

महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार

महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु

बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार

कंत्राटी नोकरभरती बंद करणार

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार

जाती जणगणनना करणार

दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार

अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार

सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन

-बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार

एमपीएससी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणार

महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार

शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवणार

महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार

महिलांचा बस प्रवास मोफत करणार

सहा घरगुती गॅस सिलेंडर ५०० रुपयांत देणार

महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत दोन दिवस ऐच्छिक रजा देणार

जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर १ लाख रुपये देणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT