Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

MAFPDA Protest: सरसकट बंद मागे न घेतल्याचा ‘माफदा’चा खुलासा

Fertilizer Purchase Strike: कंपन्यांकडून खत खरेदीवेळी जबरदस्तीने इतर उत्पादने विकण्याची (लिंकिंग) प्रथा थांबवण्याची मागणी करत माफदा (MAFPDA) ने सुरू केलेले आंदोलन अजूनही सुरू आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: रासायनिक खत कंपन्यांकडून होत असलेली लिंकिंग बंद होत नाही तोपर्यंत लिंकिंग असलेली खत खरेदी बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईड्स सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) जाहीर केले आहे.

चार दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर ‘माफदा’च्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती. या बैठकीनंतर माफदाने खत खरेदी बंद आंदोलन मागे घेतल्याचे कृषी विभागाने जाहीर केले होते. त्यावर माफदाने खुलासा केला असून जोवर कंपन्यांकडून होत असलेली लिंकिंग बंद होत नाही तोवर खत खरेदी बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

माफदाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रासायनिक खत कंपन्यांकडून होत असलेली लिंकिंग बंद होण्यासाठी विक्रेत्यांनी १ मे पासून खत खरेदी बंद केली होती. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी लिंकिंग असलेली खत खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ यांचे म्हणणे आहे.

तसेच विक्रेत्यांनी खत खरेदी बंद केल्याने खतांनी भरलेली जहाजे धक्क्याला असल्याने लिंकिंग मागे घेत केवळ खत विक्री करण्यात आली. मात्र, आता पुन्हा कंपन्यांनी खतांसोबत लिंकिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लिंकिंग असलेली खत खरेदी न करण्याचा निर्णय माफदाने घेतला आहे.

ही खत खरेदी बंदची मोहीम जोवर लिंकिंग बंद होत नाही तोवर सुरू राहणार आहे. ज्या कंपन्यांकडून लिंकिंग विरहित खते दिली जातील, असे लेखी पत्र घेऊन त्याची एक प्रत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि माफदाकडे द्यावी, असे आवाहनही पत्रकात केले आहे. पत्र दिलेल्या कंपन्यांची खते खरेदी करण्यास आणि विकण्यास विक्रेत्यांना मुभा असेल असेही पत्रकात अध्यक्ष तराळ आणि महासचिव विपिन कासलीवाल यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

Water Scarcity Management: विक्रमगड तालुक्यात रोहयोतून वनराई बंधारे उभारण्याची मागणी

Farmers Demand: पावसाच्या खंडामुळे सरसकट पीकविमा द्या; अकोल्यातील शेतकऱ्यांची मागणी

NAINA Project: नैना प्रकल्पातील प्रलंबित प्रश्नांवर शेतकरी संघटना संघर्ष तीव्र करणार

SCROLL FOR NEXT