Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Crisis : पावसाअभावी प्रकल्पांतील आवक अल्प

Water Storage : खानदेशात यंदा पावसाचा जोर सुरवातीपासून नाही. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. पाऊस नसल्याने विविध सिंचन प्रकल्पांतील आवकही अल्प किंवा शून्यावर आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पावसाचा जोर सुरवातीपासून नाही. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. पाऊस नसल्याने विविध सिंचन प्रकल्पांतील आवकही अल्प किंवा शून्यावर आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होता.

विविध सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळी वाढली होती. तर काही सिंचन प्रकल्प या पावसात पूर्ण भरले. त्यात रावेरातील मंगरूळ प्रकल्प १०० टक्के भरला होता. पण यंदा तशी स्थिती नाही.

चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातील जलसाठाही लाभक्षेत्रातील पावसाने वाढला आहे. पण अल्प आवक या धरणात सुरू आहे. गिरणा धरण सुमारे ६६ टक्के भरले आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु नांदगाव व जळगावातील चाळीसगाव तालुक्याच्या सिमेवर हे धरण आहे.

त्याचा लाभ जळगावला अधिक असून, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगावातील २१ हजार हेक्टरला लाभ होते. रब्बी हंगामास पाणी मिळते. तसेच नाशिकमधील मालेगाव औद्योगिक वसाहतीसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहर व अन्य १०० गावांच्या पाणी योजनांनाही गिरणा धरणातून पाणी दिले जाते.

या धरणात मागील वर्षी पावसाळा बरा होता. यामुळे गिरणातील जलसाठा १०० टक्के होता. यंदा मात्र जलसाठा कमी आहे. मध्यंतरी नाशिकमधील पावसाने धरणात जलसाठा वाढला. परंतु त्यातील आवक आता कमी होत आहे. या धरणात नाशिकमधील ठेंगोडा बंधारा व हरणबारी, चणकापूर, केळझर, पुनद या प्रकल्पांतून पाण्याची आवक सुरू होती. आता फक्त अल्प आवक सुरू आहे.

नाशिकमधील चांदवड, सटाणा, मालेगाव व नांदगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील आवकेत वाढ होईल, अशी माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतील जलसाठा अल्प आहे.

जामनेरातील तोंडापूर, वाघूर धरणातही आवक नाही. धुळ्यातील अनेर, अमरावती, बुराई, सोनवद या प्रकल्पांत यंदा पाण्याची अत्यल्प आवक झाली आहे. पावसाळ्याचे ७१ दिवस पूर्ण झाले आहेत. पुढील काळात पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील. अन्यथा समस्या बिकट बनले, असे दिसत आहे.

हतनूरमधून विसर्ग सुरूच

तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. परंतु त्यातून विसर्ग सुरूच आहे. जलसाठा नियंत्रणासाठी त्यातून विसर्ग केला जात आहे. जळगावात चोपड्यातील गूळ, जामनेरातील कांग, रावेरातील सुकी नदीतही प्रवाही पाणी नाही. नंदुरबारात गोमाई नदीतही प्रवाही पाणी नाही. नदी-नाले कोरडे असल्याने टंचाई वाढू शकते, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT