Coriander  Agrowon
ॲग्रो विशेष

Coriander Rate : चाकणला उन्हाळ्यातही कोथिंबीर मातीमोल

Chakan Market : कोथिंबिरीची आवक अधिक असली तरी एका जुडीला अगदी एक, दोन, तीन रुपये भाव मिळाला.

Team Agrowon

Pune News : येथील महात्मा फुले बाजारात सुमारे एक लाख कोथिंबिरीच्या जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीची आवक अधिक असली तरी एका जुडीला अगदी एक, दोन, तीन रुपये भाव मिळाला. उठाव नसल्याने कोथिंबिरीचे भाव घसरले आणि कोथिंबीर मातीमोल झाली.

उत्पादन खर्च व भाडे वसूल न झाल्याने शेतकऱ्यांनी कोथिंबिरीचे ढीग तसेच बाजारात टाकून दिले. त्यातून कोणी कोथिंबीर फुकट नेली तर कोथिंबिरीच्या ढिगावर अगदी शेळ्या, मेंढ्यांनी ताव मारला. खेड तालुक्यात कांदा, बटाट्याची काढणी झाल्यानंतर काही शेतकरी कोथिंबिरीचे पीक घेतात.

परंतु यावर्षी ऊन तापले असूनही कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे तर दर घसरत आहेत. कोथिंबिरीचे भाव अगदी एक रुपयापासून दोन, तीन रुपयांवर आले आहेत.

पुणे, मुंबई, पिंपरी -चिंचवड परिसरात चाकण परिसरातून कोथिंबीर विक्रीसाठी जाते. उठाव कमी असल्याने कोथिंबिरीचे भाव घसरत असल्याचे शेतकरी, विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले की, उन्हाळ्याचे दिवस असले तरी सध्या बाजारात कोथिंबिरीची आवक मोठी आहे व उठाव कमी आहे.

त्यामुळे कोथिंबिरीचे भाव घसरत आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, भाडे खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी ढीग तसेच टाकून जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT