Kharif Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Damage : सततच्या, अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यांमध्ये शुक्रवारी (ता. २) या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५१.५ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. सततच्या तसेच अतिपावसामुळे पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य व केंद्र आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तालुका महसूल प्रशासनाकडे केली आहे.

पालम तालुक्यामध्ये यंदा १ जूनपासून शुक्रवार (ता. २)पर्यंत सरासरी ३६२.९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी ५१४.४ मिलिमीटर म्हणजेच १५१.५ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. रावराजूर मंडलात सरासरी ३६२.९ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६०३.७ मिलिमीटर (१६६.४ टक्के) म्हणजेच सरासरीपेक्षा २४०.८ मिलिमीटर (६६.४ टक्के) अधिक पाऊस झाला आहे.

गुरुवारी (ता. १) तालुक्यातील पालम, बनवस, पेठशिवणी या मंडलात अतिवृष्टी झाली. १ जून ते २ ऑगस्ट या कालावधीत मंडलनिहाय दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमानाचा विचार करता पालम तालुक्यातील सर्व ५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा अधिक त्यातही रावराजूर मंडलामध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, १६ ते २० पर्जन्य दिनाची नोंद झाली आहे. जमीन वाफसा स्थितीत नसल्यामुळे आंतरमशागती, कीटकनाशके, तणनाशकांची फवारणी खोळंबली आहे.

परिणामी, मृदा आर्द्रता निर्देशांक व सामान्य वनस्पती निर्देशांक या दोन्ही निर्देशांकांचे मूल्य नकारात्मक झाल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद बलाच्या निधीतून जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालम येथील तहसीलदारांकडे केली आहे.

पालम तालुका पाऊस स्थिती

शुक्रवार, ता. २ पर्यंत (मिमीमध्ये)

मंडल अपेक्षित पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

पालम ३६३.९ ५१०.६ १४०.७

चाटोरी ३६२.९ ४०५.९ १११.८

बनवस ३६२.९ ५५४.६ १५२.८

पेठशिवणी ३६२.९ ४९४.४ १३६.२

रावराजूर ३६२.९ ६०३.७ १६६.४

पालम तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये सततच्या व अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी.
हेमचंद्र शिंदे, रावराजूर, ता. पालम, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT