Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Team Agrowon

Nanded News : एक ते पाच सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला अंदाजे पाच हजार हेक्टरहून अधिक पिकांचे क्षेत्र बाधित झाले असे दाखवले होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

बोळसा ग.प. येथे साखळी उपोषण केले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनांना यश आले असून महसूल विभागाने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत आता पाच हजारऐवजी २४ हजार ४६ हेक्टर एवढे शेतीचे क्षेत्र बाधित झाल्याचे दाखविले आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

गोदावरी काठचा शंभर टक्के भाग व उर्वरित ७० टक्के शेतीचे क्षेत्र बाधित दाखविण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणार आहे. नुकसानीपोटी तालुक्याला जवळपास ३५ कोटी एवढे अनुदान मिळू शकते.

यापूर्वी महसूल विभागाने फक्त ५ हजार २९ हेक्टर एवढे क्षेत्र अतिवृष्टीमध्ये बाधित दाखविले होते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी काठचा संपूर्ण भाग तसेच इतर भागातही नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, ऊस आदी पिकांचे यात नुकसान झाले.

मात्र, नुकसान दाखविताना महसूल विभागाने अगोदर हे क्षेत्र अत्यंत कमी दाखविले होते. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार होता. यामुळे बोळसा गंगापट्टी येथील महादेव मंदिरात पूरग्रस्त शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केले. तसेच, तहसील कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. याची दखल प्रशासनाने आता घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

SCROLL FOR NEXT