Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation Record : कांदा लागवड नोंदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

Onion Malpractice : तालुका कृषी विभागाअंतर्गत पीकविमा कंपन्यामार्फत कांदा लागवड नोंद घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

Team Agrowon

Buldhana News : तालुका कृषी विभागाअंतर्गत पीकविमा कंपन्यामार्फत कांदा लागवड नोंद घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

याबाबत सखोल चौकशी करून कांदा लागवड सर्व्हेमधील गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुका कृषी कार्यालयामार्फत कांदा लागवडीचा सर्व्हे सुरू आहे. सर्व्हे करण्यासाठी नेमलेले हंगामी कर्मचारी नोंद घेण्यासाठी प्रत्येक गावात प्रति शेतकरी ५०० रुपये घेऊन बोगस नोंदी करीत आहेत.

यामध्ये तालुक्यातील विझोरा या गावात सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेऊन बोगस नोंदी केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून क्यू आर स्वरूपात तसेच फोन पेद्वारे पैसे स्वीकारले आहेत.

सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. त्यामुळे सदर प्रकाराची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, मुबारक चाऊस, शंकर वाघमारे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT