Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

LokSabha Election 2024: मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Maval LokSabha Election 2024 : दोन्ही शिवसेना आमने-सामने, कोण बाजी मारणार बारणे की वाघेरे?

गणेश कोरे

Pune News : शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुभंगलेल्या शिवसेनेचे दोन शिलेदार मावळ लोकसभा मतदार संघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत, तर ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले अजित पवार समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे लढत आहेत. यामुळे मावळमध्ये मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार याचीच चर्चा आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडमधील घाटावरील (पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा) व रायगडमधील (पनवेल, कर्जत, उरण) हे घाटाखालील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. शहरी, उद्योगनगरी, आयटी पार्क आणि शेती असा चार विभागांमध्ये हा मतदार संघ विभागला आहे. मात्र बहुतांश भाग हा उद्योगनगरी आणि आयटी पार्कचा आहे.

यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी, गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांनी हा मतदारसंघ वेढलेला आहे. मावळ मतदार संघाची स्थापना झाल्यापासून गेल्या तीन वेळा शिवसेनेच्या उमेदवाराने अनुक्रमे दिवंगत गजानन बाबर आणि सलग दोन वेळा श्रीरंग बारणे यांनी या मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य राखले आहे.

या अगोदर दिवंगत रामकृष्ण मोरे आणि १९९१ मध्ये खुद्द अजित पवार यांनी या मतदार संघाचे (बारामती लोकसभा मतदार संघात या परिसराचा समावेश होता) प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे या मतदार संघाच्या विकासात आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवार यांचा कटाक्ष असतो. मात्र आताच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या राजकीय स्थित्यंतरात मतदार कोणत्या शिवसेनेला स्वीकारतात याची उत्सुकता लागली आहे.

पार्थ पवार यांच्या पराभवाचे शल्य कायम
गेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या पराभवाचे शल्य अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांना आहे. मात्र आता त्याच बारणे यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. तरीही महायुतीचा धर्म म्हणून प्रचार सुरू असला तरी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व मावळचे आमदार आमदार सुनील शेळके सक्रिय दिसत नाहीत. हे वाघेरे यांच्या पथ्यावर आहे.

स्थायी समितीच्या सदस्या होत्या. एवढी सर्व पदे राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर काहीशी राजकारणापासून अलिप्त झालेल्या संजोग वाघेरे यांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी हेरले आणि शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेत थेट उमेदवारी दिली. ही राजकीय खेळी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.

तर अजित पवार यांनीच वाघेरे यांना शिवसेनेत पाठविल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या कन्येच्या लग्नात संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याची चित्रफीत अनेक तर्कवितर्कांना खतपाणी घालणारी ठरली.

वाघेरे-पवार चित्रफितीची बारणेंना धास्ती
वाघेरे यांनी अजित पवारांच्या पाया पडल्याच्या चित्रफितीची श्रीरंग बारणे यांनी धास्ती घेतली आहे. यामुळे बारणे यांची अजित पवार यांनी पार्थ पवार यांनी प्रचारात येण्याचा आग्रह असतो. या चित्रफितीबाबत अजित पवार यांनी देखील स्पष्टीकरण देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही याबाबतची चर्चा थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सध्याचे वातावरण आहे.

भाजपचा बारणेंना विरोध
नंतर प्रचारात सक्रिय

मावळ लोकसभा मतदार संघावर भाजपने देखील दावा केला होता.
त्यामुळे बारणेंची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला. मात्र आता भाजपचे कार्यकर्तेदेखील आता कामाला लागल्याचे भासवीत आहेत.

भाजपच्या प्रचारावर करडी नजर ठेवण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या अहवालावर विधानसभेची गणित आखाडे ठरणार असून, विधान सभेसाठीचे इच्छुक कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहेत.

शेतीप्रश्‍नांकडे दुर्लक्ष
शहरीकरण, औद्योगिकीकरण, आयटी पार्कने वेढलेल्या मावळ मतदार संघात मावळ तालुक्यात फ्लोरिकल्चर पार्क आणि क्लस्टर उभारण्यात आले आहे. तर भात उत्पादकांचा हा मतदार संघ असून, पनवेल, उरण आणि कर्जत या तालुक्यांमध्ये शेती आणि पर्यावरणाचे प्रश्‍न उग्ररूप धारण करत आहेत.

दोन्ही उमेदवार शेती क्षेत्राशी निगडित असून, त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क आणि मावळ येथील फूल उत्पादकांना निर्यात सुविधा केंद्राची मागणी असून, कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या अपेक्षा तरुण शेतकरी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT