Loan Update Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Update : जालन्यात उद्दिष्टाच्या केवळ ३८ टक्केच कर्ज पुरवठा

Jalna Zilha Bank : जालना जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी मिळून २६ जून पर्यंत ४७९ कोटी पाच लाख रुपये कर्ज पुरवठा करत ३८ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली आहे.

Team Agrowon

Kharif Season : जालना जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी मिळून २६ जून पर्यंत ४७९ कोटी पाच लाख रुपये कर्ज पुरवठा करत ३८ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली आहे.

कर्जपुरवठ्यात जिल्हा व ग्रामीण बँकेने आघाडी घेतल्याची दिसत असून सर्वाधिक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यापारी बँका मात्र कर्जपुरवठ्यात पिछाडीवर असल्याचे दिसते आहे.

लांबलेला व अपेक्षेप्रमाणे न पडणारा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत असतानाच कर्ज पुरवठ्याची गतीही शेतकऱ्यांना दिलासा देणारी दिसत नाही. जालना जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी १५० कोटी रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यापाठोपाठ व्यापारी बँकांना ८८९ कोटी व ग्रामीण बँकेला २१० कोटी रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्व बँकांनी मिळून २६ जून अखेरपर्यंत ८३ हजार ३९८ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ९५७ हेक्टर क्षेत्रासाठी ४७९ कोटी ५ लाख रुपये कर्ज पुरवठा करत ३८ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

यामध्ये जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या ७० टक्के, व्यापारी बँकांनी २५ टक्के तर ग्रामीण बँकांनी ७२ टक्के कर्ज पुरवठा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

झालेला कर्ज पुरवठा पाहता जिल्हा बँकेची कर्जपुरवठ्यात आघाडी दिसत असून सर्वाधिक कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यापारी बँकांचा पुन्हा एकदा कर्ज पुरवठा करताना हात आखडता दिसतो आहे. शिवाय पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याचा विषयही केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT