Crop loan distribution Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : खरिपासाठी १,२७८ कोटीचे कर्ज वितरण

Financial Support : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी, ग्रामीण बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण केले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी, ग्रामीण बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण केले आहे. जुलै अखेर १ लाख २३ हजार ५८८ शेतकऱ्यांना १,२७८ कोटींचे कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेकडून सर्वाधिक शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज वितरण केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामासाठी १ लाख ६३ हजार ८३९ शेतकऱ्यांना १,८६५ कोटी १५ लाखाचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बॅंकांना दिले आहे. त्यानुसार बॅंकांनी कर्ज वितरण करण्यास एप्रिल महिन्यापासून प्रारंभ केला आहे. दरम्यान, यंदा पावसाने वेळेत सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी देखील उरकली आहे. त्यामुळे पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रांची पुर्तता करून बॅंकांकडे सादर केल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी आल्या नाहीत.

जून महिना अखेर ५५९ कोटींचे कर्जाचे वितरण केले होते. यामध्ये जिल्हा बॅंक कर्ज वितरण करण्यात आघाडीवर आहे. जुलै महिन्यात देखील जिल्हा बॅंक कर्ज वाटपात आघाडीवर आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढे आले असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंकांनी ५८ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. तर खासगी आणि ग्रामीण बॅंकांकडून कर्ज वितरणात मागे राहिल्या आहेत.

रब्बीसाठी १,२६० कोटीचे उद्दिष्ट

खरीप हंगामातील कर्ज वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी १ लाख १७ हजार ९४४ शेतकऱ्यांना १२६० कोटीचे उद्दिष्ट जिल्हा बॅंकांना दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन महिन्यानंतर रब्बी हंगामातील कर्ज वितरणाचे नियोजन केले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

खरीप हंगाम कर्ज वितरण दृष्टिक्षेप

बॅंक सभासद संख्या रक्कम

जिल्हा बॅंक १,०२,०४५ ८९८ कोटी ३३ लाख

राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका १७,९८५ ३०१ कोटी ६३ लाख

खासगी बॅंका ३३६३ ७४ कोटी ५८ लाख

ग्रामीण बॅंका १९२ ३ कोटी ४६ लाख

एकूण १,२३,५८८ १२७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT