Sugar Factory FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : पाच साखर कारखान्यांना थकहमीवर कर्ज

Sugarcane season : राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासकीय थकहमीवर ६३१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Maharashtra News : राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासकीय थकहमीवर ६३१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर राज्य सरकारने मेहरनजर ठेवली आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चंद्रभागानगर, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, जयभवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लक्ष्मीनगर, येळेगाव, नांदेड, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना पडसाळी, माढा, सोलापूर या पाच साखर कारखान्यांना थकहमीवर कर्ज कारखान्यांना थकहमीवर कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊसाहेब चव्हाण सहकारी साखर कारखान्याला १४७ कोटी ७९ लाख रुपयांची थकहमी मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर या कारखान्याला १२८ कोटी, भाजपचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याला ५९ कोटी ४९ लाख रुपये, कल्याण काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या १४६ कोटी ३२ लाख, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याला १५० कोटी रुपयांचे कर्ज थकहमीवर देण्यात आले आहे.

यातील बहुतांश साखर कारखाने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाशी संबंधित आहेत. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर राज्य सहकारी बँकेतून कर्ज देण्यासाठी नव्याने धोरण ठरविण्यात आले आहे. याआधी एनसीडीसीतून कर्ज देण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात आले होते. त्यानुसार एनसीडीसीकडून भाजपच्या साखर कारखानदारांना कर्जाला थकहमी दिली होती. आता अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित कारखान्यांना थकहमी दिली आहे. पुढील सहा वर्षांत प्रतिवर्षी १२ हप्त्यांत ही रक्कम परतफेड करायची आहे. तसेच या कर्जाची परतफेड होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळातील सर्व संचालक, तसेच संचालक मंडळातील एखादा संचालक मयत किंवा अपात्र झाल्यास त्याजागी निवडून येणाऱ्या नवीन संचालकाने त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर कायदेशीर प्रक्रिया करून बोजा चढवावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Prices: 'रब्बी'तही खतांची चिंता! युरिया, 'डीएपी' १० ते १५ टक्क्यांनी महागणार; कारण काय?

Mid Day Meal: चार महिन्यांपासून इंधन, भाजीपाल्याचे अनुदान थकित

NABARD Insurance: शेतपिकांसह आता दूध उत्पादन, मत्स्यपालन क्षेत्रालाही विमा संरक्षण, काय आहे 'नाबार्ड'ची नवीन योजना

PM Kisan 21st Installment: पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट, 'या' शेतकऱ्यांना २ हजार मिळणार नाहीत

Panchayatraj Abhiyaan: महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात!

SCROLL FOR NEXT