Livestock Census  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

Livestock Census : शहरी भागासाठी ८५, ग्रामीण भागात ३१३ प्रगणक नियुक्त

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव : राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडे असलेले गोवंशीय, म्हैसवर्गीय, शेळी मेंढी आदी दुग्धोत्पादन तसेच शेतीपयोगी कामात येणाऱ्या पशुधनाची गणना १९१९ पासून करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागांतर्गत २१ वी पशुगणना ४ नोव्हेंबरपासून सुरू झाली, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. अनिल शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधन गणनेसाठी राज्यभरात सुमारे नऊ हजारांहून अधिक प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ३२१ प्रगणक अणि ७७ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे-करण्यात येणार असल्याचेही पशुसंवर्धन विभाग प्रशासनाने म्हटले आहे. आतापर्यंत पशुधनाच्या २० गणना करण्यात आल्या आहेत. यावर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान देशभरात २१ वी पशुगणना सुरू झाली आहे. पशुगणना केवळ धोरणकर्त्यासाठीच नाही तर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त असल्याने दर पाच वर्षांनी ही गणना केली जात आहे. पशुगणनेमुळे राज्यातील पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

यात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या एकूण १६ पशुधन जाती, कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. पाळीव पशुंची माहिती आणि आकडेवारी अचूकपणे प्राप्त व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रप्रणालीयुक्त मोबाईल ॲपचा वापर करण्यात येणार आहे. मोबाईल ॲपचा वापर कसा करावा, याचीदखील माहिती प्रगणक आणि पशुधन पर्यवेक्षक यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात ३१३ तर शहरी भागात ८५ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे.

घरोघरी जाणार प्रगणक

आतापर्यंत जिल्ह्यात २० पशुगणना करण्यात आल्या आहे. २१ वी पशुधन गणनेसाठी जिल्ह्यात १५ तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पशुधन पर्यवेक्षक गणना कर्मचारी ग्रामीण तसेच शहरी भागात घरोघरी जाऊन पशुमालकांकडे असलेले गोवंश, म्हैसवर्गीय तसेच कुक्कुट, वराह आदी पशुधनाची माहिती नोंदविण्यात येणार असून, टॅगिंग केल्याशिवाय पशुगणना करू नये, अशा सूचनाही प्रगणकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

Crop Loan Distribution : सांगली जिल्ह्यात रब्बीसाठी १२६० कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT