Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका पाऊस

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. घाटमाथ्यावर कमीअधिक स्वरूपात पाऊस झाला. तर गुरुवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना घाटमाथ्यावर सर्वाधिक १०४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. या पावसामुळे धरणात अजूनही आवक सुरूच आहे.

गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली असून पुन्हा कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे पिके वाफसाअवस्थेत येऊ लागली आहेत.

कोकणातील ठाणे जिल्ह्यातील बलकुम, मुंब्रा येथे ४३ मिलिमीटर, रायगडमधील बिरवडी येथे ५६ मिलिमीटर, रत्नागिरीतील धामणंद येथे ४२ मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील पेंडूर येथे ४३, आबोली ५६ मिलिमीटर, पालघरमधील मोखडा, खोडला येथे २५ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कोकणातील नद्या अजूनही भरून वाहत आहेत.

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अजूनही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. नाशिकमधील इगतपुरी, घोटी येथे ७९ मिलिमीटर, नंदुरबारमधील खापर, मोरांबा ३२ मिलिमीटर, पुणेतील भोलावडे येथे ३८ मिलिमीटर, तर कार्ला ६९, लोणावळा ३९, वेल्हा ५६ मिलिमीटर, साताऱ्यातील केळघर येथे ४३ मिलिमीटर तर महाबळेश्‍वर ५०, तापोळा ४५, लामज ७१ मिलिमीटर, सांगलीतील चरण येथे ३२ मिलिमीटर, कोल्हापुरातील आंबा येथे ५४ मिलिमीटर, तर कडगाव ५२, करंजफेन येथे २८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांत अजूनही आवक सुरू असून धरणांतून विसर्ग सुरू आहे. खानदेशात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात पाऊस नसल्याने शेतातील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पिकांना चांगलाच आधार मिळत आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे २३ मिलिमीटर, तर कापशी २१, बार्शीटाकळी २२, महान २० मिलिमीटर, वाशीममधील शिरपूर येथे २१ मिलिमीटर, तर मंगळूरपीर २३, येवता येथे ३१ मिलिमीटर, अमरावतीतील मंगरूळ २१ मिलिमीटर, वर्ध्यातील सेवाग्राम येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळत असली तर काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना नुकसानकारक ठरत आहे.

पाऊस दृष्टिक्षेपात

- कोकणात हलका ते मध्यम सरी

- मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी

- विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस

- घाटमाथ्यावर जोर ओसरला

घाटमाथ्यावरील पावसाची स्थिती

घाटमाथा --- पाऊस मिलिमीटरमध्ये

कोयना -- १०४

दावडी -- ८९

अंबोणे--- ६७

शिरगाव -- ६०

ताम्हिणी -- ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT