Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Padalse Irrigation Scheme : पहिल्या टप्प्यात २५ हजार हेक्टर सिंचनाखाली

Agriculture Irrigation : निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात २५ हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ७० ते ७५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात २५ हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ७० ते ७५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. मी काम करणारा माणूस आहे. काम करून दाखवीत आहे.

येणाऱ्या काळात योजना कार्यान्वित झाल्यावर शेतकरी भाकरीत आपला चेहरा पाहतील, असेच काम झालेले दिसेल, अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.

शासकीय उपसा सिंचन योजना तीन व चारचे भूमिपूजन येथील गांधली येथे आमदार पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता.१०) झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत मी पाडळसरे धरण सुप्रमा, महसूलची नवीन प्रशासकीय इमारत, शहरात २०० कोटी रुपयांची २४ बाय ७ नवीन पाणीपुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली आहेत. पाठपुरावा केला म्हणूनच आता १० टीएमसीचे धरण १७ टीएमसीचे झाले आहे.

धरण तर होणार मात्र, धरणाचे पाणी शेतात पोचविण्यासाठी राजस्थानमध्ये असलेली टेक्नॉलॉजी आपण वापरत आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली चौथी सुप्रमा मिळवली. यात पहिल्या टप्प्यात पाच शासकीय सिंचन योजनांचा समावेश केल्याने शेतकऱ्यांच्या शेतात बंद जलवाहिनीद्वारे पाणी पोचणार आहे.

यावेळी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शाखा अभियंता भिकेश भटूरकर, ठेकेदार अमेय खरमाटे, कल्पेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. शत्रूग्न पाटील यांनी आभार मानले.

धरण १०० टक्के पूर्ण होणार : खासदार वाघ

धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजना मार्गी लागताय, हे महत्वाचं आहे. धरण सर्वांसाठीच संजीवनी ठरणार आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील आपल्यासोबत आहेत. आपले पाडळसरे धरण खाली असल्याने उपसा सिंचनशिवाय पर्याय नव्हता.

आता बंद जलवाहिनीमुळे ७० टक्के पाणी शेतात पोचेल. भविष्यात काहीही राजकीय घडामोडी होवोत, तालुका व विकास म्हणून अनिल पाटील व मी एकत्रच काम करू आणि सर्व कामे मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार स्मिता वाघ यांनी यावेळी बोलताना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT